आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री उर्मिला कोठारेचं हे मनमोहक रुप पाहिलंय का तुम्ही!  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री म्हणजे उर्मिला कानिटकर-कोठारे. मुलगी जिजाच्या जन्मापासून उर्मिला मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण अधूनमधून ती जाहिरातींमध्ये झळकतेय. अलीकडेच ती एका अॅड फिल्ममध्ये झळकली होती. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहे.


अलीकडेच उर्मिलाने एक ग्लॅमरस फोटोशूट केलंय. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर भरत पवारने उर्मिलाचे मनमोहक रुप आपल्या कॅमे-यात कैद केलं आहे.

ब्लॅक-रेड कॉम्बिनेशनच्या ड्रेसमध्ये उर्मिला अतिशय सुंदर दिसतेय. तिचे हे रुप बघून फक्त वॉव हेच शब्द आपल्या तोंडून बाहेर पडतील. उर्मिलाने तिच्या फोटोशूटची झलक तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे.  दुनियादारी, काकण, मला आई व्हायचंय यासह अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवणा-या उर्मिलाला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी नक्कीच तिचे चाहते आतुर असतील.   

बातम्या आणखी आहेत...