Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | ADR Report 64 candidates has criminal record and 109 candidates are milliner

६४ उमेदवारांवर गंभीर गुन्हे, १०९ उमेदवार कोट्यधीश - एडीआरचा अहवाल

प्रतिनिधी | Update - Apr 25, 2019, 09:09 AM IST

चौथ्या टप्प्यात ३२० उमेदवार रिंगणात

 • ADR Report 64 candidates has criminal record and 109 candidates are milliner

  नागपूर - लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील चौथ्या व अंतिम टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणातील ३२० उमेदवारांपैकी ६४ उमेदवारांविरुद्ध (२०%) गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. एका उमेदवाराने खुनाचा, ३ उमेदवारांनी खुनाच्या प्रयत्नाचा, १० जणांवर महिलांविरुद्ध अत्याचाराचे, २ उमेदवारांविरुद्ध अपहरणाचे तर ६ उमेदवारांवर चोरी, दरोड्यासारखे गुन्हेही दाखल आहेत. महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थांनी महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यात १७ मतदारसंघातील ३२३ पैकी ३२० उमेदवारांच्या शपथपत्रांमधील बाबींचे विश्लेषण केले असून त्यातून ही माहिती पुढे आली आहे.


  ३२० पैकी ८९ (२८%) उमेदवारांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हेगारी प्रकरणांची माहिती दिली आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ६४ उमेदवारांपैकी दोघांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध असल्याचे जाहीर केले आहे. वंचित आघाडीचे नाशिक मतदारसंघातील उमेदवार पवन चंद्रकांत पवार यांनी त्यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती दिली आहे. तर तीन उमेदवारांनी त्यांच्या विरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असल्याचे जाहीर केले आहे. ४ उमेदवारांवर सांप्रदायिक आणि द्वेषयुक्त भाषण केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

  ३४% उमेदवार कोट्यधीश

  ३२० पैकी १०९ उमेदवार (३४%) कोट्यधीश. वंचित आघाडीचे व बसपचे प्रत्येकी ६ उमेदवार कोट्यधीश. उमेदवारांकडे सरासरी ४.४७ कोटींपेक्षा जास्त मालमत्ता.

  गंभीर गुन्हे दाखल

  वंचित आघाडीच्या ५, बसपच्या ४, शिवसेनेच्या ४, काँग्रेसच्या ९ पैकी १, भाजपच्या ७ पैकी ३ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७ पैकी २ उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

  61 लाखांचे सरासरी कर्ज सर्व उमेदवारांवर

  > 66 लाख सरासरी कर्ज भाजप उमेदवारांवर
  > 7.92 कोटी सरासरी कर्ज काँग्रेसच्या उमेदवारांवर
  > 4.19 कोटी सरासरी कर्ज राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर
  > 1.88 कोटी सरासरी कर्ज शिवसेनेच्या उमेदवारांवर

  पक्षनिहाय सरासरी मालमत्ता

  > 40.02 कोटी काँग्रेस

  > 21.09 कोटी राष्ट्रवादी

  > 20.14 कोटी शिवसेना
  > 9.87 कोटी वंचित आघाडी
  > 17.23 कोटी भाजप
  > 1.22 कोटी बसप

Trending