७१ उमेदवार कोट्यधीश, ७५ विरुद्ध गुन्हेगारी प्रकरणे : एडीआरचा अहवाल

प्रतिनिधी

Apr 21,2019 09:02:00 AM IST

मुंबई - येत्या २३ एप्रिल रोजी महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहेत. या टप्प्यात मराठवाड्यातील औरंगाबाद, जालनासह अहमदनगर, बारामती, हातकणंगले, कोल्हापूर, रायगड, जळगाव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रावेर, सांगली व सातारा या १४ मतदारसंघातून २४९ उमेदवार रिंगणात आहेत. पैकी ४ उमेदवारांचे शपथपत्र उपलब्ध निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध नसल्याने २४५ उमेदवारांच्या शपथपत्रांचा अभ्यास असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) संस्थेने केला आहे. तिसऱ्या टप्प्यातील ७१ उमेदवार कोट्यधीश असून ७५ जणांविरुद्ध गुन्हेगारी प्रकरणे दाखल आहेत. मालमत्तेच्या बाबतीत टॉप टेन यादीमध्ये चार उमेदवार राष्ट्रवादीचे असून भाजपचा एक उमेदवार आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांचाही टॉप टेनमध्ये समावेश असून ते आठव्या क्रमांकावर आहेत. शिवसेनेचा एकही उमेदवार टॉप टेनमध्ये नाही. मात्र बसप आणि पीपल्स युनियन पार्टीचा प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश या यादीमध्ये आहे.

नऊ विद्यमान खासदारांच्या संपत्तीत ७३ टक्के वाढ

उदनयराजे भोसले, सुप्रिया सुळे,धनंजय महाडिक, संजय पाटील, रावसाहेब दानवे, रक्षा खडसे, अनंत गीते, विनायक राऊत व चंद्रकांत खैरे हे ९ विद्यमान खासदार पुन्हा निवडणूक लढवत आहेत. यांची सरासरी मालमत्ता ५३.९६ कोटी आहे. २०१४ मध्ये यांची मालमत्ता ३१.२३ कोटी होती. ५ वर्षात या खासदारांची संपत्ती २२.७३ कोटी म्हणजेच ७३ टक्क्यांची वाढली आहे. यात पहिल्या क्रमांकावर उदयनराजे भोसले असून त्यांच्या संपत्ती ३००% वाढली. शिवसेनेच्या तीन खासदारांच्या संपत्तीत ८%, राष्ट्रवादीच्या ३ खासदारांची संपत्ती ८५%, भाजपच्या ३ खासदारांच्या संपत्ती ३६% वाढली.

देणी-कर्ज असलेले टॉप 5 उमेदवार
रणजित निंबाळकर 89 कोटी

सुभाष झांबड 19 कोटी

धनंजय महाडिक 13 कोटी

दौलत शितोळे 11+ कोटी

संजयकाका शिंदे 11 कोटी

245 पैकी 75 उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणे दाखल आहेत

वंचित बहुजन आघाडी : 06
बसपा : 05

भाजप : 05
राष्ट्रवादी काँग्रेस : 05
शिवसेना : 03

काँग्रेस : 03

X
COMMENT