आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कित्येक आजारांवर बहुगुणी अडुळसा आहे उपयुक्त 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खोकला येत असून ताप येत असेल तर अडुळशाच्या रसाने कमी होतो. खोकल्यावर अडुळशाचा अवलेह देतात. अडुळसा, ज्येष्ठमध, बेहडा, हळकुंड, फुलवलेला टाकणखार समप्रमाणात घेऊन मिश्रण करून ठेवावे. हे मोठ्यांनी २ ग्रॅम व लहानांनी १ ग्रॅम मधाबरोबर आठवडावर घ्यावे, खोकला बरा होतो. टाकणखार नसेल तर साखर घ्यावी. 

श्वास विकारावर : होते. 

रक्तपित्तावर : रक्तपित्त म्हणजे नाकातून अथवा तोंडातून रक्त येत असल्यास अडुळसा द्यावा. १० मि. लि. अडुळशाचा रस तितकीच खडीसाखर घालून द्यावा, रक्त पडण्याचे कमी होते.अडुळशाच्या पानांचा डोक्यावर लेप घातला असता नाकातून वाहणारे रक्त बंद होते. 

स्त्रियांच्या प्रदरावर : प्रदरावर अडुळशाचा रस १० मि.लि. व खडीसाखर १० ग्रॅम, रोज तीन वेळा घ्यावी. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या प्रदरावर म्हणजे अंगावरून पांढरे जाणे, अंगावरून पाणी जाणे, पाळीच्या स्रावात दुर्गंधी तसेच अतिस्राव किंवा कमी स्राव, गुठळ्या पडणे या सर्व विकारांत अडुळसा महत्त्वाचे औषध ठरते. स्त्रियांचे सर्व प्रकारचे प्रदर अडुळसा बरे करतो. 

देवीच्या साथीवर : गावात देवीची साथ आली असता ज्या मुलांना देवी आल्या नाहीत किंवा टोचल्या नाहीत, त्यांना अडुळशाच्या पानांचा व ज्येष्ठमधाचा काढा रोज एक वेळ दिला असता देवी येण्याची भीती कमी होते. तो घेतल्याने देवीपासून भीती कमी राहते. 

क्षयरोगावर : क्षयरोगावर औषध करताना काढ्यात अडुळशाचे एक पान व एक लहान ज्येष्ठमधाचा तुकडा (सुमारे तीन ग्रॅम) घालून पाव लिटर पाणी घालावे व अष्टमांश काढा करून घ्यावा. हा काढा क्षयरोगावर उत्तम समजला जातो. क्षय झाला असता अडुळशाचा अवलेह देतात. 

दमेकऱ्यांना औषधी : अडुळसा कफनाशक आहे. अडुळशाच्या पानांच्या विड्या करून त्या ओढल्या असता छातीतील कफ पातळ होऊन दमेकरी मनुष्यास फार सुखावह वाटते. 

डोकेदुखीवर : डोकेदुखी जडली असता डोक्यावर अडुळशाच्या पानांचा लेप लावला की, डोकेदुखी पूर्णपणे थांबते. अडुळशाच्या पानांचा नुसता रस निघत नाही. पाने शेकून रस काढला तर चांगला निघतो. 

अडुळसा अवलेह : एक लिटर अडुळशाचा रस घेऊन त्यात त्याच्या चतुर्थांश म्हणजे पाव किलो साखर घालावी व मंदाग्नीवर ठेवावा. रसास चांगली तार आली म्हणजे उतरून खाली ठेवावा. थोडा गार झाल्यावर त्या रसाच्या निमपट म्हणजे रसाचे निम्मे अर्थात अर्धा लिटर मध व पाव किलो साखरेच्या निम्मे १०० ग्रॅम पिंपळी घालून सर्व मिश्रण बरणीत भरून ठेवावे. आणि मग काही दिवसांनी हा अवलेह मुरू लागतो. तो लेह मुरला म्हणजे औषध म्हणून उपयोगात आणावा. 

जखमेवर किंवा व्रणावर : अडुळशाची पाने बारीक वाटून ती जखमेवर बांधली असता जखम भरून येते. 
जीर्ण ज्वरावर : जीर्णज्वर झाला असता अडुळशाचा लेह देतात. 

बातम्या आणखी आहेत...