Home | Khabrein Jara Hat Ke | adult star turned preacher warns womens about the dangers of the job

एकेकाळी होती प्रसिद्ध पोर्न स्टार, आता बनली आहे धर्म प्रसारक, इतरांना देते या फिल्डपासून लांब राहण्याचा सल्ला 

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 12, 2019, 12:00 AM IST

पूर्वीश्रमीची ही पोर्नस्टार म्हणाली पैशाच्या झगमगाटासमोर अनेक गोष्टी दिसतच नाहीत. 

 • adult star turned preacher warns womens about the dangers of the job

  कॅलिफोर्निया - अमेररिकेची एक पूर्वाश्रमीची पोर्नस्टार आता धर्म प्रसारक बनली आहे. ती आता इतर महिलांना या क्षेत्रापासून लांब राहण्याचा सल्ला देत आहे. ती फक्त असे सांगत नसून पोर्न स्टारला कोण कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो तसेच यातील धोकाही सांगते. आर्थिक तंगी आणि लवकर श्रीमंत बनण्याच्या लालसेपोटी या क्षेत्रात आल्याचे ती सांगते. पण आता तिला पश्चात्ताप झाला आहे. आजीच्या सल्ल्याने कशाप्रकारे महिलेचे संपूर्ण आयुष्य बदलले आणि तिने हे क्षेत्र सोडजले हेही महिलेने सांगितले आहे.

  पुढे वाचा, इंटरनेटवर कायम राहणार काम..

 • adult star turned preacher warns womens about the dangers of the job

  आजीच्या सल्ल्याने बदलले जीवन 
  - अमेरिकेच्या सॅन डियागोच्या कॉर्नरस्टोनमध्ये राहणारी ब्रिटनी डी ला मोरा (31) आणि तिचा पती धर्म प्रसारक आहेत. त्यामुळेच ते चर्चमध्ये धार्मिक उपदेशही देतात. 
  - 6 वर्षांपूर्वीपर्यंत ब्रिटनी अत्यंत यशस्वी पोर्नस्टार होती. तिने जेना प्रेस्ले नावाने 300 हून जास्त पोर्न व्हिडिओजमध्ये काम केले होते. ती महिन्याला जवळपास 30 हजार डॉलर (सुमारे 21 लाख रुपये) कमवायची. पण प्रीचर म्हणजे धर्मोपदेशक बनण्यासाठी तिने पोर्न इंडस्ट्री सोडली. 
  - काही वर्षांपूर्वी एक डायरेक्टरने ब्रिटनीला वजन कमी करण्यास सांगितले तर तिने खाणे-पिणे एवढे कमी केले की तिला अॅनोरेक्सिया नावाचा आजार झाला. त्यानंतर तिने हेरोइन आणि कोकेनचे व्यसन करण्यास सुरुवात केली. 
  - त्यानंतर ब्रिटनीला एक लैंगिक आजार जडला. त्यानंतर आजीने तिला चर्चमध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्याचवेळी तिचे संपूर्ण जीवन बदलून गेले. चर्चमध्ये गेल्यावर तिच्यावर असाकाही परिणाम झाला आणि अखेर तिने 2012 मध्ये पोर्न इंडस्ट्री सोडली. 
   

   

 • adult star turned preacher warns womens about the dangers of the job

  इंटरनेटवर कायम राहील काम 
  - नुकत्या एका इंटरव्ह्यू मध्ये ब्रिटनीने इतर महिलांना पोर्न इंडस्ट्रीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. या क्षेत्रातील अनेक अशा अडचणी आहेत ज्या पैशाच्या झगमगाटात दिसत नाहीत. 
  - ब्रिटनीने सांगितले की, ती असे यासाठी म्हणत आहे कारण तिने ते काम सुरू केले तेव्हा ती भविष्याबाबत विचार करत नव्हती. पण तुम्ही भविष्याचा विचार करत असाल तर पोर्न इंडस्ट्रीत जाण्याआधी तुम्हाला हे लक्षात असायला हवे की, तुम्ही जे काम करणार आहात ते आयुष्यभर इंटरनेटवर राहील. 
  - ब्रिटनीच्या मते तुम्ही एकदा पोर्न इंडस्ट्रीत काम केले तर त्याचा परिणाम कायम तुमच्या जीवनावर पडत राहतो. कारण इंटरनेटच्या जगात तुमचे काम कायम राहते. त्याचा तुम्हाला त्रासही होत राहतो. 
  - स्वतःचे उदाहरण देताना ब्रिटनीने सांगितले, लोक नेहमी विचारतात की तुम्ही धर्म प्रसारक बनल्या आहात मग व्हिडिओ इंटरनेटवरून का हटवत नाहीत. तेव्हा मला त्यांना सांगावे लागते की, पोर्न इंडस्ट्रीतील कॉन्ट्रॅक्ट साइन केल्याने त्यांचे नियम कायदे पाळणे गरजेचेच असते. अशे व्हिडिओ त्यांची प्रॉपर्टी असतात, आपण ते हटवू शकत नाही. 


   

 • adult star turned preacher warns womens about the dangers of the job

  आता मुलांची काळजी 
  - ब्रिटनी स्वतःबाबत सांगताना म्हणाली का, आता तिची मुले होतील तेव्हा तिच्या या फुटेजचा त्यांच्यावर कसा परिणाम होईल याची तिला भीती आहे. यामुळेच ती इतर महिलांनाही याबाबत अलर्ट करत आहे. 
  - या क्षेत्रात येणाऱ्या महिलांना ती म्हणाली, तुमच्या मुलांचे काय होईल, ते शाळेत गेल्यानंतर त्यांची खिल्ली उडवली जावी किंवा त्यांना त्रास दिला जावा असे वाटते का असेही ती म्हणाली. 
  - ब्रिटनीचे म्हणणे आहे की, घरातील लोकांना ती फारशी आवडत नव्हती. तसेच शिकण्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसे नव्हते, त्यामुळे पैसे कमावण्यासाठी ती याक्षेत्रात आली. 

 • adult star turned preacher warns womens about the dangers of the job

Trending