Home | National | Other State | Adulteration in every food sold in festival season specially Paneer

होळीचा सण येताच बाजारात सुरू झाली भेसळयुक्त अन्नाची विक्री, हे विषारी अन्न आपण डोळे झाकून घेतो, जाणून घ्या कसे बनवतात हे अन्न...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 16, 2019, 03:55 PM IST

पनीर-खोआ खरा आहे का बेसळयुक्त हे या 5 टीप्सद्वारे माहिती करू शकता.

 • Adulteration in every food sold in festival season specially Paneer

  मुजफ्फरपूर(बिहार)- जिल्ह्यात भेसळयुक्त खवा, पनीर, छेना विकून लोकांच्या आयुष्याशी खेळण्याचे काम सुरू आहे. या भेसळयुक्त अन्नाचा धंदा दिवसाढवळ्या सुरू आहे. प्रामुख्याने शहरी भागात याची मोठ्या प्रमामात विक्ती होत असते. आता सध्या होळीमुळे या पदार्थांची मागणी वाढलेली आहे. लखनऊ आणि कानपूर सारख्या शहरातदेखील या पदार्थांयी आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. भारतात अनेक सण आहेत आणि या सणासदुच्या प्रसंगी लोक मीठाई आणि इतर पदार्थ खातात. त्याचाच फायदा हे भेसळयुक्त अन्न बनवणारे घेत आहेत. खवा, पनीर, छेना, बुंदी, किंवा इतर मीठाईंमध्ये भेसळ केली जात आहे. त्याशिवाय तेल, मसाले आणि इतर सामानांमध्येही भेसळ केली जात आहे. होळीत तर केमिकलयुक्त रंगदेखील बाजारात विकल्या जातात. यावर्षीदेखील हे सगळे पदार्थ कमी किमतीत विकल्या जात आहेत. सांगितले जाते की लखनऊ, कानपूर इत्यादी शहरातून मागवलेले सामान मुजफ्फरपूर वरून मोतिहारी, बेतिया, सीतामढ़ी, दरभंगा, समस्तीपूरसोबतच नेपाळ पर्यंत पाठवले जाते. हे धंदा करणारे लोक या सामानांना मुख्या रस्त्यावरून न पाठवता, गावातील रस्त्यावरून पाठवतात.


  अशाप्रकारे तयार करतात खवा
  एका व्यावसायिकाने सांगितले की, स्किम्ड दुध आणि पाम ऑइलच्या मिश्रणातून एक पेस्ट तयार केली जाते. त्यानंतर त्याला उकळवले जाते. नंतर सॅफोलाइट नावाचे केमिकल, उकळलले बटाटे, अरारोट आणि रताळ्याला त्यात मिळवून याला तयार केले जाते. खरं दिसण्यासाठी त्यात रंग किंवा इसेंस टाकले जाते.


  होउ शकतो कँसर
  भेसळयुक्त खोआ आणि पनीरमुळे पोटदुखी, डायरिया, अॅसिडिटी आणि इनडायझेशनसारख्या सम्यस्या उद्भवू शकतात. याच्या जास्त सेवनाने इंटरनल ऑर्गन्सवर वाईट वरिणाम होऊ शकतो. सगल तीन महिने हेर भेसळयुक्त अन्न खाल्यास लिव्हर कँसर होण्याची शक्यता आहे.


  पनीर आणि खव्याची शुद्धता याप्रकारे जाणून घ्या

  - पनीर किंवा खव्याचा छोटा तुकडा हातावर रगडा. लगेच ते तुटत असेल तर समजुन जा की, यात भेसळ आहे.

  - थोडा वेळ उकळून नंतर थंड करावे आणि नंतर त्यावर आयोडीन टाकावे. जर निळा रंग आला तर ते अन्न भेसळयुक्त आहे.


  जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते
  याला 3 भागात मिस ब्रँड, सबस्टँडर्ड आणि अनसेफमध्ये विभागून तपास केला जातो. भेसळ आढळल्यास 3 ते 5 लाखांचा दंड आणि 6 महिन्यांपासून ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होउ शकते.

Trending