आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताची क्षमता असूनही पाकिस्तानकडून 20 लाख मेट्रिक टन साखरेची खरेदी कशासाठी? 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- भारतात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. नियोजित उत्पादनापेक्षा २० टक्के अधिक साखर उत्पादित होईल अशी क्षमता देशाची असतानादेखील या सरकारने पाकिस्तानकडून वीस लाख मेट्रिक टन साखर विकत का घेतली? राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह इतर पक्षांमध्ये स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणवून घेणाऱ्यांनी या सरकारला हा प्रश्न का विचारला नाही ? या भाजप-आरएसएसवाल्या सरकारला शेतकरी जमिनीत गाडायचा आहे, अशी जोरदार टीका करत आता तरी या भांडवलशाही सरकारचे धोरण लक्षात घ्या, वंचितांचं हक्काचं सरकार स्थापन करण्यासाठी सर्वच लहान जातींच्या लोकांना संघटित करून येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वंचित बहुजन आघाडी लढवणार असल्याचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बीड येथे सत्ता संपादन निर्धार मेळाव्यात जाहीर केले. 

 

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बीड शहरामध्ये शनिवारी ( दि.१२) सत्ता संपादन निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये अॅड. प्रकाश आंबेडकर बोलत होते. व्यासपीठावर एमआयएम पक्षाचे उत्तर प्रदेशचे प्रवक्ते मुफ्ती कामीत, माजी आमदार हरिभाऊ भदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

 

अॅड. आंबेडकर म्हणाले, शाहू-फुले-आंबेडकरांनी शेतकऱ्यांना जिवंत राहण्यासाठी शेतीउपयोगी धोरणांची अंमलबजावणी करण्यावर भर दिला. पुढे यशवंतराव चव्हाणांनी शेतकऱ्यांचे उद्याचं बरं' होण्यासाठी प्रयत्न केले. हा एवढा मोठा इतिहास असतानादेखील शेतकरी नेते म्हणवून घेणाऱ्यांनी यशवंतरावांचे विचार मातीत गाडले आहेत. आपल्या जातीच्या नेत्याचा आदर्श जपावा, आपला नेता हा असताना सोन्याच्या चमच्याने घास खाल्ला जात होता. आताची सरकारी धोरणं ही मातीत गाडण्याची प्रक्रिया करू लागली आहेत ही व्यथा विसरून चालणार नाही. 

 

भागवतांना इफ्तार पार्टी चालते, वंचित घटकातील लोक का नाही चालत? 
आरएसएसचे सर्वेसर्वा मोहन भागवत यांना मुसलमानांबरोबर इफ्तार पार्टी चालते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील इफ्तार पार्टीत सहभागी होतात. त्यांना वंचित घटकातील लोक का चालत नाहीत? इफ्तार चालतो, मग मोहंमद का चालत नाही ? त्यांना मतासाठी सर्व काही चालतं. परंतु विकासासाठी, कल्याणकारी योजना वंचितांसाठी राबवता येत नाहीत हे त्यांचे षडयंत्र उघडकीस आलेले आहे. आमच्याकडे कुठे चाकू जरी निदर्शनास आला तर आम्हाला अटक केली जाते. मात्र मोहन भागवत यांच्याकडे एके फोर्टी सेव्हन आली कुठून? त्यांच्याकडे पैसे खरेदीसाठी आले कुठून? आणि त्यांना ही कशासाठी लागते? हे जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सरकार काम करेल. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना येणाऱ्या काळात विजयी करण्याचे आवाहनदेखील अॅड. आंबेडकर यांनी केले. 

बातम्या आणखी आहेत...