आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेला विधानसभेत सुवर्णसंधी, स्वतंत्र लढावे - अॅड. प्रकाश आंबेडकर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - ‘मनसेने स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे, कारण या पक्षाला आता सुवर्णसंधी आहे. शिवसेनेचे खासदार जरी निवडून आले असले, तरी हा पक्ष कोमात आहे. युतीचा १३५-१३५ व भाजपचे मित्रपक्ष १८ असा फॉर्म्युला ठरला असला तरी मनसेला भाजप व मित्रपक्षांच्या १५३ जागांवर स्कोप आहे. त्यांनी ही सुवर्णसंधी गमावू नये,’ असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. राष्ट्रवादीचे १० व काँग्रेसचे काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी  या वेळी केला. 


अॅड. आंबेडकर म्हणाले, ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी लाेकसभा निवडणुकीच आमच्यासाेबत यावे याविषयी आम्ही विचारले हाेते. त्यांना हातकणंगलेत निवडून आणण्याची गॅरंटीही आम्ही घेतली हाेती. मात्र ते काँग्रेस आघाडीसाेबत गेले. आता विधानसभा निवडणुकीत ‘वंचित’सोबत यायचे की नाही, हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे,’ असा टोलाही अॅड. आंबेडकरांनी लगावला.  


भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी मुस्लिमांना हिणवू नये
भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या मुस्लिमांना वाटा दिला, या प्रतिक्रियेचा समाचार घेताना अॅड. आंबेडकर म्हणाले की, ‘जेव्हा पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा त्यांना जो वाटा देण्यात आला, तो इथल्या मुस्लिमांचा वाटा नाही, त्यामुळे भंडारी यांनी इथल्या मुस्लिमांना हिणवू नये.’