आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'माझ्या नव-याची बायको' फेम अद्वैत दादरकर दिसणार नव्या भूमिकेत 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः झी युवा ही मराठी वाहिनी, आजच्या पिढीची आवड लक्षात घेऊन, अत्यंत उत्कृष्ट आणि दर्जेदार असे कार्यक्रम प्रेक्षकांना देत आहे. लवकरच 'युवा डान्सिंग क्वीन' हा एक नवीन बहारदार नृत्याचा कार्यक्रम झी युवा वाहिनीवर पहायला मिळणार आहे, ज्यामध्ये नावाजलेल्या सेलेब्रिटींमध्ये मध्ये एक जंगी चुरस रंगेल. युवा डान्सिंग क्वीन हा अफाट सौंदर्य आणि बेफाम नृत्य यांची एक अकल्पनीय सांगड असेल. या कार्यक्रमात प्रेक्षकांना लोकनृत्य आणि कंटेम्पररी डान्स फॉर्म्स ह्यांचा अनोखा मेळ पाहायला मिळेल. युवा डान्सिंग क्वीन मुळे आता ऐन थंडीत रंग चढणार, महाराष्ट्राचं टेंपरेचर वाढणार.   


या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'माझ्या नव-याची बायको' या मालिकेत सौमित्रची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता अद्वैत दादरकर नव्या भूमिकेतून आपल्या भेटीला येणार आहे. गुणी नाट्यलेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून नाट्यवर्तुळात प्रसिद्ध असलेला अद्वैत दादरकर हा युवा डान्सिंग क्वीन या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन करणार आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून उत्तम कामगिरी बजावणारा अद्वैत आता ही सूत्रसंचालनची जबाबदारी कशी पार पाडेल याकडे प्रेक्षकांचं लक्ष असेल. तसेच या कार्यक्रमात कोण अभिनेत्री सहभागी होणार आहेत व परीक्षकांची भूमिका कोण बजावणार आहे, हे देखील प्रेक्षकांना लवकरच कळेल.