आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Advance Booking Of Deepika Padukone's Upcoming 'Chhapak' Cancels Is Happening, Along With Screenshots

दीपिका पादुकोणच्या आगामी 'छपाक'चे अॅडव्हान्स बुकींग होत आहे कॅन्सल, ट्विटरवर #BoycottChhapaak ट्रेंड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जेएनयूत सुरू असलेल्या आंदोलनात दिपीकाने सहभाग नोंदवला होता

मुंबई- बॉलिवूड अॅक्ट्रेस दीपिका पादुकोण आपल्या आगामी 'छपाक' च्या प्रदर्शनापूर्वी मंगळवारी जेएनयूमद्ये पोहचली होती. तिथे तिने आंदोलकांमध्ये जाऊन आपली उपस्थिती दर्शवली होती. जिथे एकीकडे दीपिकाने उचलेलल्या पाऊलाचे कौतुक होत आहे तर दुसरीकडे दीपिकाचे आंदोलनात सहभाग नोंदवणे काही लोकांना आवडलेले नाही. आंदोलनात सहभाग नोंदवल्याबद्दल दीपिकाला ट्रोल केले जात आहे. इतकच नाही तर तिच्या आगामी छपाकचे अॅडव्हान्स बुकींग कॅन्सल होत आहे आणि सोशल मीडिया #BoycottChhapaak ट्रेंड होत आहे.

मंगळवारी रात्रीपासूनच लोकांनी 'छपाक'चा विरोध करने सुरू केले होते. आता बुक केलेले तिकीटही लोक कॅन्सल करत आहेत. तसेच, कॅन्सल केलेल्या तिकीटांचे स्क्रीनशॉटही शेअर केले जात आहेत.  काही लोकांनी इतरांना अपील केली आहे की, 'छपाक'ऐवजी तुम्ही 'तानाजी' पाहायला जा. 'छपाक' आणि 'तानाजी' 10 जानेवारी 2020 ला रिलीज होत आहेत आणि रिलीजच्या आधी दिपीकाने उचललेल्या या पाउलामुळे तिच्या चित्रपटावर परिणाम होण्याची चिन्ह दिसत आहेत.  

बातम्या आणखी आहेत...