आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टू-व्हीलरमधील स्पोक व्हील्स की अलॉय व्हील्स.....हे आहेत फायदे-तोटे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो डेस्क - एक काळ होता जेव्हा बाइकच्या मॉडिफिकेशनची मोठी निशाणी अलॉय व्हील्स असायचे कारण तेव्हा सामान्य बाइकमध्ये मेकर्स स्पोक व्हील्सच देत असत. तेव्हापासून आतापर्यंत अलॉय व्हील्स चांगले की स्पोक व्हील्स ही चर्चा सुरू आहे...

स्पोक व्हील्स
हे जास्त टिकाऊ असतात. ऑफ रोड बाइक्स, डर्ट बाइक्स, स्क्रेम्बलर्समध्ये ते आजही वापरात येतात. भारतात हीरो एक्सपल्स २०० आणि रॉयल एनफील्ड हिमालयनमध्ये स्पोक व्हील्स दिले जातात. महाग मानल्या गेलेल्या ट्रायम्फ स्क्रॅम्बलर १२०० एक्ससी आणि डुकाटी मल्टीस्ट्राडा १२६० एनड्युरोमध्ये ट्यूबलेस स्पोक रिम्स दिसतात.

फायदे
जेव्हा बाइक, ऑफ रोडिंगदरम्यान उंचवट्यावरून जाते तेव्हा स्पोक लवचिक असल्याने बऱ्याच मर्यादेपर्यंत धक्के सहन करतात. जर काही नुकसान झाले तर ते सहज ठीक करता येऊ शकतात. त्याचे सुटे भाग सहजपणे बदलता येऊ शकतात आणि ते स्वस्तही असतात.

तोटे
बहुतांश बाइक्समध्ये स्पोक व्हील्सच्या आत ट्यूब असतात, ते बदलणे, दुरुस्त करणे, त्यांचे पंक्चर जोडणे मोठे काम असते, कारण पूर्ण व्हील असेम्ब्ली बाहेर काढायची असते. ढिले-तुटलेले स्पोक ठीक करणेही त्रासदायक आहे. ट्यूबलेस स्पोक व्हील महाग असतात.

अलॉय व्हील्स
१९७० च्या दशकापासून जगात त्याचा वापर केला जात आहे, पण भारतात त्यांना बराच वेळ लागला. ते कास्ट-अॅल्युमिनियमचे असतात. काही काळानुसार ते खूप स्वस्त झाले आणि मेकर्स किमतीतील बचतीमुळे त्यांचा खूप वापर करू लागले. दिसण्यास सुंदर असल्यामुळे आता तर हे कमी बजेट असलेल्या बाइक्समध्येही दिले जातात. 

फायदे
त्यांच्या कठोरपणाचा फायदा परफॉर्मन्सला होतो आणि त्यामुळे ते जास्त हॉर्सपॉवर आणि टॉर्कच्या दबावावर टिकून राहतात. हाय स्पीडवर स्थिर असतात, खूप वेगाने घेतलेल्या वळणावर जागा सोडत नाहीत. ट्यूबलेस असल्यामुळे पंक्चर काढणे, टायर बदलणे खूप सोपे असते.

तोटे
हे बिलकुल लवचिक नसतात, अगदी कडक असतात. चाक अति वेगाने खड्ड्यातून किंवा स्पीड ब्रेकरवरून जाते, तेव्हा त्यात क्रॅक किंवा डेंट येतात. ते दुरुस्तही होत नाहीत, त्यांना बदलावेच लागते. थोड्याशा कारणामुळे खूप जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात.
 

बातम्या आणखी आहेत...