आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशियात पहिल्यांदाच 'अॅडव्हेंचर नेक्स्ट इंडिया 2018' चे यशस्वीरित्या केले आयोजन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेश पर्यटन ने आशियातील आयोजित ऍडव्हेंचर पर्यटनक्षेत्रात पहिल्यांदाच 4 आणि 5 डिसेंबर 2018 रोजी नवीन आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर-मिंटो हॉल, भोपाळ, मध्य प्रदेश, भारत येथे पहिल्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमादरम्यान, विशेष बैठकी, शैक्षणिक सत्र (चौक बाजार) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. परदेशातील प्रतिनिधी आणि प्रवक्ते या सत्रात सहभागी झाले आणि ऍडव्हेंचर पर्यटन क्षेत्रात नेटवर्किंग संधींबद्दल चर्चा केली.
 
या परिषदेमध्ये एकूण 200 पेक्षा जास्त लोक ज्यामध्ये विक्रीदार, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवरील मीडिया, हॉस्पिटॅलिटी व टूर ऑपरेटर संघांचे प्रतिनिधी तसचे ऍडव्हेंचर टूर ऑपरेटर असोसिएशनचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. भारत सरकार पर्यटन मंत्रालयाचे संयुक्त सचिव माननीय सुमन बिल्ला, एटीओएआयचे अध्यक्ष श्री. स्वदेश कुमार  आणि एडवेंचर नेक्स्ट कमेटीचे अध्यक्ष श्री कुमारसह अन्य मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते.
 
या प्रसंगी मध्यप्रदेश पर्यटन विभागाचे प्रधान सचिव आणि व्यवस्थापन संचालक मंत्री हरी रंजन राव (आयएएस), म्हणाले, '' सर्वव्यापी ऍडव्हेंचर पर्यटनाचे आयोजन पहिल्यांदाच भारतात होत आहे आणि या कार्यक्रमाचे आयोजन मध्यप्रदेशात होत आहे ही आमच्यासाठी खुप मोठी गोष्ट आहे. आशियातील सर्वात  सर्व आंतरराष्ट्रीय विक्रीदार , मीडिया आणि राष्ट्रीय प्रतिनिधींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला त्यांचे आम्ही आभार मानतो. अॅडव्हेंचर नेक्स्टच्या निमित्ताने भारतातील पर्यटन क्षेत्राची उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे "
 
प्रसंगी ऍडव्हेंचर नेक्स्ट आणि ऍडव्हेंचर ट्रॅव्हल असोसिएशन चे प्रमुख कार्यकारी अधिकारी शॅनन स्टोव्हल म्हणाले, '' मध्यप्रदेश पर्यटनासोबत आम्हाला अडव्हेंचर नेक्स्ट 2018 चे आयोजन करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत . मध्यप्रदेशात ऍडव्हेंचर पर्यटनाला प्रचंड वाव आहे. ऍडव्हेंचर नेक्स्ट च्या निमित्ताने  भारताच्या धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा, वन्यजीव आणि वास्तुकला यावर विशेष प्रकाश टाकण्यात येईल. आगामी दिवसांत देशातील विविध भागांमध्ये अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा विचार एटीटीए करत आहे. "
 
'पल्स ऑफ टुमारो' या सांकल्पनेवर आधारीत या दोनदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी वाइल्डलाइफ टुरिझम इकॉनॉमी आणि इमर्सिव्ह टेक्नोलॉजीसारख्या विषयावर चर्चा झाली,तसेच पारंपारिक गोंड कला शोसारख्या शैक्षणिक कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात भारतीय लोकनृत्य जसे की भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, आदिवासी लोकनृत्याने तेथील उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.मध्यप्रदेश देखील वेगवेगळ्या ठिकाणी परिचित ट्रिपचे आयोजन करेल आणि विश्वास ठेवेल की या दौर्यात प्रत्येक प्रवाश्याचे मन आणि कल्पनाशक्ती बळकट होईल.

 

बातम्या आणखी आहेत...