आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वकिलास मारहाणीचा भुसावळ विभागात निषेध

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


भुसावळ - उलट तपासणीत प्रश्न विचारल्याचा राग आल्याने अमळनेर येथे अॅड.दिनेश पाटील यांना मारहाण केली होती. न्यायालयाच्या आवारात मंगळवारी हा प्रकार झाला होता. या घटनेचा भुसावळ, मुक्ताईनगर व रावेर येथील वकील बांधवांनी कामकाजात सहभागी न होता निषेध केला. 

 

भुसावळातील वकिलांनी बुधवारी कामात सहभाग घेतला नाही. दिवसभरात फक्त रिमांडचे काम करण्यात आले. सकाळपासूनच वकिलांनी कामात सहभाग न घेता बसून राहणे पसंत केले. वकिलास झालेली मारहाण गंभीर बाब असल्याचे भुसावळ तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड.अशाेक शिरसाठ यांनी सांगितले. मुक्ताईनगर येथे तालुका वकील संघाचे घटनेचा निषेध करत संबंधितावर कारवाईची मागणी केली. यानंतर वकील संघाचे तालुकाध्यक्ष अॅड.संतोष इंगळे यांना निवेदन दिले. सचिव अॅड.उमेश जवरे यांच्यासह पी.एल.पाटील, संतोष टावरी, एस.एम.तायडे, तुषार पटेल, राहुल पाटील, देविदास काळे, रमेश हागे, विनोद इंगळे, ललित पुजारी, नीरज पाटील हजर होते. अॅड.पाटील यांच्यावर दाखल विनयभंगाचा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी रावेर तहसीलदारांकडे करण्यात आली. या घटनेमुळे पक्षकारांची बाजू मांडताना वकिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यात म्हटले आहे. निवेदनावर अॅड.एम.ए.खान, एम.बी.चौधरी, जयंत तिवारी, योगेश गजरे,व्ही.बी.कोंघे, शीतल जोशी, अमोल आर.कोघे,जे.जी.पाटील, एम.अ.एन.शेख, वकील संघ अध्यक्ष सुभाष धुंदले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...