आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयएम युतीवरून अॅड. आंबेडकर यांची पुण्याच्या पत्रकार परिषदेला दांडी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  एमआयएमसाेबत युती तुटल्याने अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील शनिवारच्या पत्रकार परिषदेला दांडी मारत एमआयएमशी काेणत्या कारणांवरून बिनसले हे गुलदस्त्यातच ठेवले आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सचिन माळी आणि संताेष शंकर यांनी आंबेडकर काही कामानिमित्त पुण्यातील पत्रकार परिषदेला आले नाहीत, असे सांगितले.

माळी म्हणाले, खासदार इम्तियाज जलील यांनी वंचित बहुजन आघाडीसाेबत युती तुटल्याचे पत्र स्वत:च्या लेटरहेडवर लिहून ते साेशल मीडियावर व्हायरल केले आहे. एमआयएमचे प्रमुख बॅरिस्टर आेवेसी यांनी यासंदर्भात काेणतीही अधिकृत घाेषणा केली नाही. 

इम्तियाज यांच्यामुळेच संभ्रम
वेगवेगळया जाती-धर्मांना लाेकसंख्येच्या टक्केवारीनुसार तिकीट द्यावयाचे, असे आम्ही ठरवले हाेते. राज्यात १२ टक्के मुस्लिम लाेकसंख्या असताना खासदार जलील हे १०० जागांची मागणी करत हाेते. त्यांना आम्ही १७ जागांचा प्रस्ताव दिला हाेता. परंतु त्यांनी जास्त जागांची मागणी करत उलटसुलट वक्तव्ये करून संभ्रम निर्माण केला. राज्यातील मुस्लिमांना वंचित बहुजन आघाडीचे संरक्षक कवच असताना ते काढण्याचे काम जलील यांनी केले आहे. जलील यांच्या निर्णयामुळे एमआयएममध्येच संभ्रमावस्था निर्माण झाली असून बॅरिस्टर आेवेसी याेग्य भूमिका घेतील, असा विश्वास आम्हाला आहे.