sangali flood / सांगलीतील पुरग्रस्त "ब्रम्हनाळ" गाव अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी घेतले दत्तक; गावात पुरवणार विविध सुविधा

ग्रामपंचायतीने पत्र देऊन पुनर्वसनासाठी आमचे गाव देत असल्याचे केले जाहीर 
 

दिव्य मराठी

Aug 14,2019 01:25:23 PM IST


सांगली - सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील ब्रम्हऩाळ गावात पुराचे पाणी घुसले असतांना स्थानिक गावकऱ्यांकडून बचावकार्य सुरु होते. यात बोट पाण्यात उलटुन 14 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या गावावर शोककळा पसरलेली आहे. याच पुरग्रस्त गावाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हे गाव दत्तक घेतले आहे.

ग्रामपंचायतीने पत्र देऊन केले जाहीर
पुरग्रस्त ब्रम्हनाळ गावातील 700 कुंटुंब, 3500 लोकसंख्या असलेल्या गावाचे पुनर्वसन करण्यासाठीची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. ब्रम्हनाळ गावात बोट अपघातात काही नागरिकांचे निधन झाले होते. या संकट काळात ब्रम्हनाळ गाव प्रकाश आंबेडकर यांनी दत्तक घेतल्याचे कळताच गावचे संरपंच व गावक-यांनी समाधानी व्यक्त केलं आहे. ग्रामपंचायतीने पत्र देऊन आम्ही पुनर्वसनासाठी आमचे गांव देत आहोत असं जाहीर केले आहे.

अशाप्रकारे करणार गावाचे पुनर्वसन
> गावामध्ये स्वच्छता आणि औषध फवारणी, आरोग्य तपासणी व औषध उपचार केले जातील.
> 700 कुंटुंबाना पुढील एक महिना पुरेल एवढी राशन धान्याची व्यवस्था केली जाईल.
> गावातील विदयार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य दिले जाईल.
> गावात स्वच्छ पाण्याची कायमस्वरुपी सोय व्हावी म्हणून वॉटर एटीएम लावण्यात येईल.
> गावकऱ्याचे मनोधैर्य उंचावण्यासाठी मानस उपचार व वर्षभर सांस्कृतीक कार्यक्रम राबविले जातील.
> गावकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.

X