आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिझनेस डेस्क - आतापर्यंत तुम्ही शेतकऱ्यांना जमीनीवर शेती करताना पाहिले असेल, पण लवकरच शेतकरी हवेत शेती करणार आहेत. चकित झालात ना? होय हे खरे आहे. हरियाणा आणि उत्तराखंड सोबतच देशाच्या उर्वरीत बटाटे उत्पादक राज्यातील शेतकरी लवकरच हवेत बटाट्याची शेती करू शकणार आहेत. हवेत शेती करण्याच्या या तंत्राला एअरोपॉनिक्स म्हटले जाते. असे सांगितले जात आहे, की या तंत्रज्ञानामुळे शेतकरी सात पट अधिक बटाट्याचे उत्पादन घेऊ शकतील.
काही दिवसांपूर्वी रोहतकमध्ये झालेल्या तीन दिवसीय थर्ड अॅग्री लिडरशिप संमेलनात या नवीन तंत्रज्ञानासाठी करनालच्या शामगडमध्ये बागायत विभागाचे संशोधन केंद्र आणि पेरूची राजधानी लीमामध्ये असलेले आंतरराष्ट्रीय बटाटे संशोधन केंद्र यांनी सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. या संमेलनात लीमाचे आंतरराष्ट्रीय बटाटे संशोधन केंद्र आणि हरियाणा सरकारचे प्रतिनिधी या एअरोपॉनिक्स तंत्रज्ञानास जगासमोर ठेवतील. 2019 मध्ये हरियाणा सरकार या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे.
काय आहे एअरोपॉनिक्स तंत्रज्ञान
एअरोपॉनिक्समध्ये मातीविना बटाट्याचे उत्पादन केले जाते. यात मोठ्या बॉक्समध्ये बटाट्याच्या रोपांना लटकवले जाते. सर्व बॉक्समध्ये वेळोवेळी पोषक तत्वे आणि पाणी टाकले जाते. या तंत्रज्ञनात रोपांच्या मुळात ओलसरपणा कायम राहतो. ज्यामुळे थोड्याच काळात बटाट्याचे रोप वाढू लागते. साधारणपणे बटाट्याच्या एका रोपामधून 5 ते 10 बटाटे निघतात. पण, या तंत्रज्ञनामुळे 70 बटाटे तयार होतील.
केंद्र सरकारकडून मंजुरी
शामगडच्या बटाटे संशोधन केंद्राचे डॉ. सत्येंद्र यादव यांनी सांगितले की, या वर्षी तंत्रज्ञान वापरण्याची परवानगी आहे. या प्रोजेक्टची परिपूर्ण रिपोर्ट तयार झाली आहे. केंद्राने सुद्धा या तंत्रज्ञनाचा प्रस्ताव मंजूर केला. हरियाणा सोबतच शिमल्यात सुद्धा याचा वापर केला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.