आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदीय निवडणुकीत झालेल्या गोंधळानंतर महिलांनी ओठ शिवून केले प्रदर्शन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काबुल(अफगानिस्तान)- काबुलमध्ये राष्ट्रपती भवनासमोर 11 महिला निवडणुकीत झालेल्या गोंधळाविरूद्ध मंगळवारी प्रदर्शन केले. यापैकी चार महिलांनी आपले ओठ शिवले होते. अफगानिस्तानच्या राज्यांमध्ये मागच्या वर्षी झालेल्या निवडणुकीत या महिलांचा पराभव झाला होता.


पैंशांची ताकत दाखवून निवडणुकीत फेरबदल केले
महिलांचा आरोप आहे की, त्या निवडणूक जिंकणार होत्या, पण गोंधळ आणि पैशांच्या जोरावर विरोधकांनी निवडणूक जिंकली. त्यांनी निकाल आपल्या बाजुने फिरवला. त्यापैकी एका महिलेने बीबीसीला सांगितले की, ओठ शिवून प्रदर्शन करणे, आमची हतबलता दर्शवते. सरकार मुकी आणि बहिरी आहे. प्रदर्शनादरम्यान एका महिला डॉक्टराने त्यांची ओठ शिवली.


सरकारने चौकशी करावी
एका महिलेने सांगितले, "आम्ही तीन महिन्यांपासून प्रदर्शन करत आहोत, पण राष्ट्रपतीकडे तीन मिनीटांचा वेळ नाहीये. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्ही प्रदर्शन करतच राहणार." एक कमिटी स्थापन करून निवडणुकीत झालेल्या गोंधळाची चौकशी करावी अशी त्यांची मागमी आहे.