आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Afghanistan :Ashraf Gani Won Il Election But, Rival Abdullah Also Declared Himself President

अफगाणिस्तानात दोन-दोन राष्ट्राध्यक्ष! अशरफ गनींनी स्फोटांमध्ये घेतली शपथ, पराभूत अब्दुल्ला स्वयंघोषित राष्ट्राध्यक्ष

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेचे विशेष राजदूत जालम खलीलजाद दोन्ही नेत्यांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत
  • अशरफ गनी यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथग्रहण कार्यक्रमात बॉम्बस्फोट

काबुल- अफगानिस्तानात राजकीय संकट आले आहे. सोमवारी अशरफ गनी यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथग्रहण कार्यक्रमात अनेक बॉम्बस्फोट झाले, यात कोणातीही जीवितहानी झालेली नाही. यातच गनी यांचे राजकीय प्रतिस्पर्धी अब्दुल्ला अब्दुल्ला यांनीदेखील स्वतःला राष्ट्राध्यक्ष घोषित केले आहे. अब्दुल्ला अब्दुल्ला अफगानिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. यातच अमेरिकेचे विशेष राजदूत जालम खलीलजाद दोन्ही नेत्यांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत. 18 फेब्रुवारीला लागलेल्या निवडणुकीच्या निकालात अशरफ गनी यांचा विजय झाला, पण अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी मतमोजनीत गडबड असल्याचा आरोप लावला. 

या वादाची सुरुात रविवारी झाली. सोमवारी सकाळी काबुलच्या राष्ट्राध्यक्ष भवनात अशरफ गनी यांचा शपथग्रहण कार्यक्रम होणार होता. यादरम्यान अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी शपथ घेण्याची घोषणा केली. इतकच नाही तर, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांना निमंत्रण दिले. हा वाद सुरू झाल्यानंतर जालम खलीलजादने दोन्ही नेत्यांशी चर्चा करुन, वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. सोमवारी दुपारपर्यंत कोणताच मार्ग न निघाल्यामुळे, अशरफ गनी यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. त्यानंतर लगेचच अब्दुल्ला अब्दुल्ला यांनीदेखील स्वतःला अफगानिस्तानचा राष्ट्राध्यक्ष घोषित केले.

तालिबानशी 10 मार्चला शांती चर्चा

या नवीन राजकीय संकटामुळे अफगानिस्तानमध्ये शांती प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. अफगान सरकारची 10 मार्चला नार्वेमध्ये तालिबानसोबत शांती चर्चा होणार आहे. यातच समाधान न निघाल्यास, शांती चर्चेत अडचणी येऊ शकतात. दोन सरकारशी चर्चा होऊ शकत नसल्याचे तालिबानने स्पष्ट केले आहे.