आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंगरहार राज्यातील मशीदीत भीषण बॉम्बस्फोट, 62 जणांचा मृत्यू तर 40 पेक्षा जास्त जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काबूल- अफगानिस्तानमधील नंगरहार राज्यात आज(शुक्रवार) दोन बॉम्ब विस्फोट झाले. यात 62 जणांचा मृत्यू झाला तर 40 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. टोलो न्यूजने सांगितल्यानुसार, दोन्ही विस्फोट नंगरहार राज्यातील एका मशीदीत झाला. लोक तिथे नमाज पठण करतहोते, त्यावेळी घटना घडली.टोलो न्यूजला एका अधिकाऱ्याने सांगितले की, मरणाऱ्यांची संख्या वाढू शकते. विस्फोटात जखमी झालेल्यांना जखमींना जवळील रुग्णालयात दाखल केले आहे. अद्याप कोणत्याच दहशतवादी संघटनेने याची जबाबदारी घेतलेली नाहीये. दोन दिवसांपूर्वीच तालिबानने अफगानिस्तानच्या पूर्वेला असलेल्या एका राज्यातील पोलिस मुख्यालयाजवळ बॉम्ब विस्फोट घडवून आणला होता, यात दोन जवान मारले गेले, तर 26 जखमी झाले होते.