आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबूलमध्‍ये मेवोद एज्‍युकेशन अॅकडमीवर आत्‍मघाती हल्‍ला, 48 जणांचा मृत्‍यू, 67 गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काबुल - अफगाणिस्‍तानमधील मेवोद एज्‍युकेशन अॅकडमीवर बुधवारी दुपारी 4 वाजेच्‍या सुमारास आत्‍मघाती हल्‍ला झाला. यामध्‍ये 48 जणांचा मृत्‍यू झाला असून 67 जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्‍तान प्रशासनाने मृतांमध्‍ये मुलांची संख्‍या जास्‍त असण्‍याची शक्‍यता वर्तविली आहे. स्‍फोटामुळे अॅकडमीतील अनेक क्‍लासेसचे छतही कोसळल्‍याची माहिती आहे.

 

अफगाण मीडियानूसार, ही अॅकडमी काबुल पीडी- 18मधील दश्त-ए-बार्ची या परिसरामध्‍ये आहे. दहशतवादी संघटना तालिबानचा प्रवक्‍ता जबिउल्‍लाह मुजाहिदने या हल्‍ल्‍यात तालिबानचा कोणत्‍याप्रकारे संबंध नसल्‍याचे म्‍हटले आहे.


मीडिया रिपोर्टनूसार, हल्‍ल्‍यावेळी अॅकडमीमध्‍ये जवळपास 100 मुले होती. ते सर्व युनिवर्सिटी एन्‍ट्रसची तयारी करत होते. यामध्‍ये मुल आणि मुली दोन्‍हींचा समावेश आहे. शहरातील शिया क्‍लर्कियल काऊंसिलचे सदस्‍य जवद घवरी यांनी हा हल्‍ला आयसीसने केला असल्‍याचे म्‍हटले आहे. घवरी यांनी सांगितले की, मागील दोन वर्षांत केवळ काबुलमध्‍ये शिया समुदायावर 13 हल्‍ले करण्‍यात आले आहेत.   

बातम्या आणखी आहेत...