आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वर्षांनंतर अाॅस्ट्रेलियाविरुद्ध भारताला अाघाडीची माेठी संधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅडिलेड- अार. अश्विन (३/५०), ईशांत शर्मा (२/३१) अाणि जसप्रीत बुमराहच्या (२/३४) अव्वल गाेलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने सलामीच्या कसाेटीत यजमान अाॅस्ट्रेलियन टीमचा माेठ्या खेळीचा प्रयत्न हाणून पाडला. या गाेलंदाजीपुढे दमछाक झालेल्या अाॅस्ट्रेलियाला पहिल्या डावात दिवसअखेर ७ बाद १९१ धावा काढता अाल्या. अद्याप यजमान  अाॅस्ट्रेलियाचा संघ ५९ धावांनी पिछाडीवर अाहे. टीमकडे अाता तीन विकेट शिल्लक अाहेत. संघाचा डाव सावरणारा टीम हेड (नाबाद ६१) हा स्टार्कसाेबत (नाबाद ८) मैदानावर कायम अाहे. मात्र, टीमला साथ देणाऱ्या इतर फलंदाजांना फार काळ अाव्हान कायम ठेवता अाले नाही. यातूनच टीम इंडियाला  १० वर्षे व ९ कसाेटीनंतर पहिल्यांदाच अाॅस्ट्रेलियावर पहिल्या डावात अाघाडीची संधी अाहे. भारताने २००८ मध्ये पर्थ कसाेटीत अाॅस्ट्रेलियावर पहिल्या डावात शेवटची  अाघाडी घेतली हाेती. या कसाेटीमध्ये भारताला अाघाडीच्या अाधारे ७२ धावांनी विजयाची नाेंद करता अाली हाेती अाता भारताने पहिल्या डावात २५० धावा काढल्या अाहेत.   अाॅस्ट्रेलियाची  निराशाजनक सुरुवात झाली.  ईशांतने विकेटचे खाते उघडले. त्याने पहिल्याच षटकात सलामीवीर अाल्यापावली पॅव्हेलियनमध्ये पाठवले.  त्याने तिसऱ्याच चेंडूवर फिंचला बाद केले.

 

टीम हेडने सावरले; कर्णधार अपयशी
यजमान अाॅस्ट्रेलियाची पडझड राेखण्यासाठी टीम हेडने कंबर कसली. त्याने संयमी खेळी करताना नाबाद अर्धशतक झळकावले. यासह त्याने टीमच्या धावसंख्येचा अालेख उंचावला. मात्र त्याला साथ देणारे कर्णधार पॅन (५) अाणि पॅट कमिन्सला (१०) फार काळ मैदानावर अाव्हान कायम ठेवता अाले नाही. मात्र, त्याने १४९ चेंडूंमध्ये ६ चाैकारांसह नाबाद ६१ धावा काढल्या अाहेत. त्यामुळे धावसंख्या उंचावली.

 

एकाच चेंडूत भारताने गुंडाळला डाव 

भारताने कालच्या ९ बाद २५० धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. मात्र, सकाळच्या पहिल्या सत्रात एकाच चेंडूवर टीम इंडियाला अापला पहिला डाव गुंडाळावा लागला. जाेश हेझलवूडने अापल्या चेंडूवर शमीला टीम पॅनकरवी झेलबाद केले. यासह भारताला पहिला डाव २५० धावांवर गुंडाळावा लागला. यादरम्यान बुमराह हा नाबाद राहिला. अाॅस्ट्रेलियाकडून हेझलवूडने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तसेच पहिल्या डावात मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स अाणि नॅथनने प्रत्येकी दाेन बळी घेतले. 

 

ईशांतचे कांगारूंविरुद्ध बळींचे अर्धशतक 
भारताच्या ईशांतने अाता बलाढ्य अाॅस्ट्रेलियाविरुद्ध अापले बळींचे अर्धशतक पूर्ण केले. त्याने यजमानांच्या कर्णधार टीम पॅनला बाद केले अाणि या टीमविरुद्धच्या ५० विकेट पूर्ण केल्या. असा पराक्रम गाजवणारा ईशांत हा भारताचा तिसरा वेगवान गाेलंदाज ठरला. यापूर्वी कपिलदेव (२० सामने, ७९ बळी) अाणि जहीर खानने (१९ सामने, ६१ बळी) अशी कामगिरी केली अाहे. या यादीत ईशांत तिसऱ्या अाणि भारताचा उमेश यादव चाैथ्या स्थानावर अाहे. उमेशच्या नावे या टीमविरुद्धच्या ११ सामन्यांत ४२ बळींची नाेंद अाहे.

बातम्या आणखी आहेत...