आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After 10 Years, Pakistan And Sri Lanka Faceof In Pakistan; First Test In Rawalpindi From Today

तब्बल १० वर्षानंतर पाकमध्ये पाकिस्तान व श्रीलंका आमने सामने; पहिली कसोटी आजपासून रावळपिंडीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाक खेळाडूंकडे २८२ कसोटींचा अनुभव, मात्र सर्व १६ खेळाडूंची पहिल्यांदाच घरच्या मैदानावर ‘टेस्ट’

इस्लामाबादमधून दिव्य मराठीसाठी शाह जमाल
 

इस्लामाबाद- पाकिस्तान व श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीला बुधवारी रावळपिंडीमध्ये सुरुवात होत आहे. पाकमध्ये १० वर्षांनी कोणती कसोटी मालिका होतेय. २००९ मध्ये श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एकही कसोटी खेळवली गेली नाही. पाक संघातील १६ खेळाडूंना एकूण २८२ कसोटींचा अनुभव आहे. मात्र, एकही खेळाडू अद्याप देशात कसोटी खेळला नाही. अशात पहिल्या कसोटीसाठी मैदानावर उतरणारे ११ खेळाडू पहिल्यांदा मायदेशात कसोटी खेळतील. कर्णधार अजहर अलीकडे सर्वाधिक ७५ कसोटींचा अनुभव आहे. १६ वर्षीय वेगवान गोलंदाज नसीम शाह पाकचा सर्वात युवा खेळाडू असेल.


दोन सामन्यांची मालिका कसोटी चॅम्पियनशिपचा भाग आहे. श्रीलंकाचे चॅम्पियनशिपमध्ये ६० गुण झाले असून पाकचे शून्य गुण आहेत. अशात पाक मालिका जिंकून आपले पहिले गुण मिळवण्याचा प्रयत्न करेल. रावळपिंडीमध्ये पाक संघाने आतापर्यंत आठ सामने खेळले आहेत. यात ३ जिंकले, ३ गमावले आणि २ ड्रॉ झाले. पाक व श्रीलंका यांच्यात या मैदानावर एकमेव कसोटी २००० मध्ये खेळवण्यात आली. ही रोमांचक कसोटी श्रीलंकेने २ विकेटने जिंकली होती. दोन्ही देशांत झालेल्या अखेरच्या ५ कसोटी सामन्यांत श्रीलंकेने ३ आणि पाकने दोन जिंकल्या .आतापर्यंत १९ द्विपक्षीय मालिका, पाकने ९ जिंकल्या 
 
दोन्ही देशांत आतापर्यंत १९ द्विपक्षीय मालिका झाल्या आहेत. पाकने ८ आणि श्रीलंकेने ६ जिंकल्या, ५ मालिका बरोबरीत सुटल्या. पाकिस्तानमध्ये दोघांत आतापर्यंत ७ मालिका झाल्या. पाकने ३ आणि श्रीलंकेने २ मालिका जिंकल्या. दोन मालिका बरोबरीत राहिल्या. दोघांत अखेरची मालिका २०१७ मध्ये दुबईत खेळवली गेली होती. श्रीलंकेने मालिका २-० ने आपल्या नावे केली.

इतर संघांसोबत खेळण्यासाठी चर्चा सुरू : एहसान मनी
 
पीसीबी अध्यक्ष एहसान मनी म्हणाले की, हा आमच्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे. आम्ही इतर संघांशी पाकमध्ये खेळण्याबाबत चर्चा करत आहोत. माजी क्रिकेटर शोएब अख्तरने म्हटले की, आमच्यासाठी अभिमानाची गोष्टी असून माझ्या घरच्या मैदानावर होत असलेल्या या सामन्याबाबत उत्सुक आहे.  दशकानंतर माझे स्वप्न पूर्ण होतेय. वसीम अक्रमने म्हटले की, मी श्रीलंकन टीमचे आभार मानतो, ते येथे कसोटी खेळण्यासाठी आहे. श्रीलंका संघाच्या सुरक्षेसाठी स्पेशल ग्रुपचे ३०० जवान


श्रीलंकन संघाच्या सुरेक्षेमध्ये कोणतीही कमी राहू नये यासाठी पाकिस्तान आर्मी स्पेशल सर्व्हिस ग्रुपचे ३०० जवान तैनात करण्यात आले आहेत. या ग्रुपमध्ये दहशतवादी विरोधी पथक, पॅरा मिलिटरी फोर्स आणि विशेष सुरक्षा जवानांचा समावेश आहे. संघ ज्या मार्गावरून जाईल, तेथे तीन चेक पोस्ट बनवल्या जातील. श्रीलंका संघाला रेड झोन सुरक्षेमध्ये ठेवण्यात आले आहे. ही सुरक्षा केवळ देशातील पाहुण्यांना मिळते.५० रुपयांत पाहू शकता कसोटी  
 
पाकिस्तान क्रिकेट मंडळाने १० वर्षांनी होत असलेल्या कसोटीसाठी चाहत्यांना अाकर्षित करण्यासाठी प्रत्येक दिवसाच्या तिकिटासाठी केवळ ५० रुपये (भारतातील २३ रुपये) दर ठेवला आहे.  पेशावर, लाहोर, इस्लामाबाद, फैसलाबाद व कराचीमध्ये तिकीट केंद्र उभारले.स्टेडियममध्ये २५ हजार प्रेक्षक क्षमता
 
रावळपिंडी स्टेडियमची २५ हजार प्रेक्षकांची क्षमता आहे. येथे पहिली कसोटी १९९३ मध्ये खेळवली गेली.  सुरक्षेसाठी ४५०० पेक्षा अधिक जवान तैनात असतील. डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल मोहम्मद एहसानने म्हटले की, स्टेडियमच्या सुरेक्षेची व्यवस्था अत्यंत चोख आहे.