आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा वर्षांनंतर सचिन तेंडूलकर कुटुंबासह साई चरणी, चरण पादुकांची केली पूजा; आरतीला लावली हजेरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोमवारी सचिन विशेष विमानाने मुंबईहून शिर्डीला आला
  • मंदिर प्रशासनाने साईची खास शाल व मूर्ती सचिनला भेट स्वरुपात दिली

शिर्डी - माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर सोमवारी 10 वर्षांनंतर साईबाबांच्या चरणी दाखल झाला. येथे त्याने पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुनसह आरतीत सहभाग घेतला आणि पादुकांची पूजा केली. सचिन साईमंदिरात दाखल होण्याची बातमी पसरताच त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. या दरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली. सचिन 10 वर्षांपूर्वी साईंच्या दरबारात आला होता. त्यानंतर सोमवारी एका विशेष विमानाने मुंबईहून शिर्डीत आला होता. मंदिर प्रशासनातर्फे सचिनला साईंची विशेष शाल आणि मूर्ती भेट स्वरूपात देण्यात आली. शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो लोक येत असतात. साईंच्या भक्तांमध्ये मोठ-मोठ्या उद्योगपतींपासून सिनेसृष्टील कलाकारांचा सहभाग आहे.