आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 वर्षांनंतर पुन्हा नामांतर व्याख्यानमाला सुरू करण्याचा निर्धार; 'दिव्य मराठी'ने घेतला पुढाकार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबादच्या परिवर्तनवादी चळवळीची ओळख असलेली नामांतर व्याख्यानमाला बंद पडली, त्याला १५ वर्षे झाली. ही व्याख्यानमाला आता पुन्हा सुरू करण्याचा निर्धार आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी केला आहे. नामांतर दिन राैप्यमहाेत्सवी वर्षात पदार्पण करत असताना 'दिव्य मराठी'ने शहरातील परिवर्तनवादी कार्यकर्त्यांची व्यापक बैठ कायाेजित केली हाेती. या बैठकीत कार्यकर्त्यांनी हा निर्धार व्यक्त केला. १४ जानेवारी २०१९ ते १४ जानेवारी २०२० दरम्यान नामांतर सोहळा साजरा करण्यासाठी रौप्यमहोत्सवी समिती स्थापन करण्यात येणार असून, 'दिव्य मराठी'ने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

 
'नामांतर व्याख्यानमाला' ही प्रामुख्याने तरुणांसाठी असावी आणि अत्याधुनिक पद्धतीने तिचे नियाेजन व्हावे, यासाठी 'दिव्य मराठी' राैप्यमहाेत्सवी समितीसाेबत असणार आहे. नामांतर सोहळ्याच्या निमित्ताने बोलावलेल्या या बैठकीला 'दिव्य मराठी'चे संपादक संजय आवटे, निवासी संपादक दीपक पटवे, युनिट हेड सुभाष बाेंद्रे, प्राचार्य डॉ. एम. ए. वाहूळ, प्रा. डाॅ. एच. एम. देसरडा यांच्यासह सुमारे ५० प्रमुख नेते- कार्यकर्ते उपस्थित हाेते. 'दिव्य मराठी'च्या भूमिकेचे स्वागत करून यंदा परिवर्तनाची नवी नांदी ठरणारा सोहळा साजरा करण्यात येईल, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. 

 

 

पैसे हा मुद्दा नाही, व्याख्यानमाला महत्त्वाची 
१५ वर्षांपूर्वी बंद पडलेल्या नामांतर व्याख्यानमालेची सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी निधीची कमतरता असते, कुणीही पैसे देण्यास पुढे येत नाही, असा मुद्दा रिपाइंचे (ए) प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद शेळके यांनी मांडला. मिलिंद महाविद्यालयाचे मैदान हवे असेल तर त्यासाठी सुमारे ३५ हजार रुपये देण्याची गरज असते, असेही त्यांनी म्हटले. त्यावर त्वरित ३५ हजार रुपये माझ्यातर्फे घ्या; पण नामांतर व्याख्यानमाला सुरू करा, अशी आग्रही भूमिका युवा उद्योजक जालिंदर शेंडगे यांनी घेतली. 
 

बातम्या आणखी आहेत...