आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 वर्षानंतर परतला आमीरचा भाऊ, 'फैक्ट्री'मधून दिग्दर्शकाच्या रुपात डेब्यू करेल फैजल खान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवुड डेस्क- आमिर खानचा भाऊ आणि 'मेला'मध्ये त्याचा को-स्टार फैजल खान लवकरच दिग्दर्शकाच्या खूर्चीत बसणार आहे. फैजल लवकरच अॅक्शन थ्रिलर 'फैक्ट्री'मधून दिग्दर्शन क्षेत्रात उतरत आहे. पण याबद्दल आमिरलाही माहिती नसल्याचे स्वतः फैजलने सांगितले.

आई आणि भावाला माहित नाही
फैजलने सांगितले की, मला नेहमीच दिग्दर्शनात उतरायचे होते, पण सगळ्या गोष्टी अपोआप होत गेल्या. सुरुवातील आम्ही "फॅक्ट्री"च्या दिग्दर्शनाची जबाबदारी शारिक मिन्हाजला दिली होती, पण तारखा मिळत नसल्याने तो हा चित्रपट करू शकला नाही. त्यानंतर मी स्वतः याचे दिग्दर्शन करण्याचे ठरवले. विशेष म्हणजे आई जीनत आणि भाऊ आमिरलाही याबाबत कोणतीही माहिती नाहीये. चित्रपटाचे एक शेड्यूल पूर्ण झाल्यानंतर मला त्यांना सरप्राइज द्यायचे होते. 

चित्रपटात गाणेही गायले
फैजलने "फैक्ट्री"मध्ये एक गाणेही गायले आहे. फैजल खानने 1994 मध्ये 'मदहोश'मधून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. पण त्यानंतर त्याला आपला ठसा उमटवता आला नाही. आमिरने आपल्या भावाचे करिअर वाचवण्यासाठी 1999 मध्ये 'मेला'चित्रपट बनवला होता, तो हीट ठरला, पण फैजल परत येऊ शकला नाही. आता त्याची दुसरी इनिंग सुरू झाली आहे, त्यात तो किती यशस्वी ठरतो, हा येणारा काळस सांगू शकेल.