आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मानंतर 2 महिन्यांनी डॉक्टर म्हणाले- तुमचे बाळ मुलगा नाही मुलगी आहे.. 10 वर्षांनी घेऊन या मग ऑपरेशन करू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिकानेर - सुजाता (बदलेले नाव) यांचा दोन महिन्यांचा मुलगा जन्मानंतर वारंवार आजारी पडत होता. त्याला उलट्या, जुलाब असा त्रास होत होता. बिकानेरचे डॉक्टर रेग्युलर उपचार करत राहिले. पण त्याची तब्येत अधिकच बिघडली तेव्हा त्याच्या हार्मोन्सची तपासणी करण्यात आली. त्यावेळी लक्षात आले की, बाळाचा एक अवयव वगळता ती पूर्णपणे मुलगी आहे. 


हार्मोन्सचे संतुलन बिघडले
1.
आई-वडिलांना काळजी वाटू लागली तेव्हा ते डॉक्टरांकडे गेले. तेव्हा उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, या स्थितीला कंजिनायटल एड्रिनल हायपर प्लेजिया (सीएएच) म्हणतात. यात महिला आणि पुरुषांमध्ये फरक निर्माण करणाऱ्या हार्मोन्सचे संतुलन बिघडते. 

2. आजार समोर आल्यानंतर त्यानुसार उपचार सुरू झाले. बाळाला ग्लूकोकार्टिसोइड हार्मोन देण्यात आले. त्यामुळे अनावश्यक वाढ होणाऱ्या हार्मोन्सवर नियंत्रण मिळवता येते. त्याने हायपर प्लेजियाही कमी होते. 

3. डॉक्टरांनी मुलाच्या आई-वडिलांनी सांगितले, बाळाच्या शरिरात असलेले हार्मोन्स ती मूळ मुलगी असून मुलीप्रमाणेच विकास होईल हे सांगत आहेत. तसेच बाळ निरोगी जीवन जगेल असेही सांगितले. 

4. डॉक्टरांनी सांगितले की, हे मूल 10 वर्षांचे झाल्यानंतर त्याचा पुरुषाचा प्रायव्हेट पार्ट ऑपरेशनने काढून त्याठिकाणी स्त्रीचा प्रायव्हेट पार्ट तयार केला जाईल. 

5. सीएएच अशा स्थितीला म्हणतात ज्यात प्रायव्हेट पार्टची अंतर्गत स्थिती वेगळी असते. मिनरलोकोर्टिसॉइड्स, ग्लूकोकोर्टिसॉइड्स किंवा सेक्स स्टेरॉइड्स हार्मोन-एंझाइमचा प्रवाह किंवा उत्पादन संतुलन बिघडल्याने होते. 

सहा महिन्यातील तिसरे प्रकरण 
6.
यापैकी एक प्रकरण उत्तर प्रदेशचे होते. 14 वर्षांचा मुलगा कँसरवर उपचारासाठी बिकानेरला आला होता. उपाचारानंतर त्याचा कँसर ठिक झाला असे डॉक्टरांनी सांगितले. आता तो स्वतःला परिस्थितीशी जुळवून घेत आहे. तर तिसऱ्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. 

प्रश्न - उत्तरे 
7.
हीच मुले समलैंगिक बनतात का?
डॉक्टरांचे उत्तर : असे होऊ शकते. त्याचे कारण हेच आहे की, ही मुले बाहेरून दिसायला जशी असतात आतून त्याच्या विपरित असतात. ते वास्तवतः प्रतिकूल लिंगाकडे आकर्षित होत असतात पण ते समलैंगिक वाटतात. 

8. अशा आजारामुळे समलैंगिक बनतात का?
डॉक्टरांचे उत्तर : नाही. हे फक्त एक कारण आहे. त्याशिवायही इतर अनेक कारणे असू शकतात. 

बातम्या आणखी आहेत...