आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After 24 Years, Women Enter In The Golden Mosque, Were Banned From Entering The Golden Mosque Because Of Increased Terrorism

२४ वर्षांनंतर महिलांना सुनहरी मशिदीत प्रवेश, दहशतवाद वाढल्यामुळे बंदी घातली होती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्ताने महिलांना दिलासा देण्याचा निर्णय
  • पहिल्या दिवशी १५ ते २० महिलांचे नमाज पठण

पेशावर - पाकिस्तानातील ऐतिहासिक सुनहरी मशिदीचे दरवाजे महिलांसाठी २४ वर्षांनंतर खुले करण्यात आले आहे. शुक्रवारी १५ ते २० महिलांनी येथे नमाजाचे पठण केले. मशीद पेशावरमधील छावणी परिसरात आहे. ईदच्या नमाजासाठीही महिलांना परवानगी देण्यात येईल असे मशीद प्रशासनाने सांगितले आहे. मशिदीच्या इमामांनी सांगितले की, हा निर्णय आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्त आणि इतर क्षेत्रातील महिलांना दिलासा देण्याच्या दृष्टीने घेण्यात आला आहे. १९९६ पूर्वी महिलांना शुक्रवारच्या नमाजावेळी मशिदीच्या वरील भागांत उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र नंतर वाढत्या दहशतवादामुळे महिलांना मशिदीत प्रवेश नाकारण्यात आला. महिलांविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला नाही


पाकिस्तानातील वृत्तवाहिन्यांनी महिला दिनानिमित्त महिलांबाबत कुठल्याही प्रकारच्या आक्षेपार्ह मजकुराचे प्रसारण करणार नाही असा निर्णय घेतला होता. पाकिस्तान इलेक्ट्रॉनित मीडिया नियामक प्राधिकरण (पेमरा) ने यासाठी पाकिस्तानातील वृत्तवाहिन्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. यात महिलांबाबत कुठल्याही प्रकारच्या आक्षेपार्ह मजकुराचे प्रसारण न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.