आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या 25 दिवसानंतर नववधुने गळफास घेऊन केली आत्महत्या, तीन दिवसांपूर्वीच माहेरवरून सासरी आली होती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुटेरा(मध्यप्रदेश)- वार्ड नंबर-4 मध्ये एका नवविवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. तीन दिवसांपूर्वीच ती माहेरवरून सासरी आली होती, आणि येताच संध्याकाळी आपल्या रूममध्ये तिने आत्महत्या केली. मुलीच्या मृत्यूची बातमी कळताच, महिलेच्या कुटुंबीयांनी तिच्या घरी धाव घेतली आणि सासरच्या लोकांवर हुंड्यासाठी आत्याचार केल्याचा आरोप लावला आहे. यावरून दोन्ही पक्षात मारहाण झाली, त्यानंतर ग्रामस्थांनी मध्यस्थी करून वाद मिटवला.


एसआय मनोज गोयल यांनी सांगितले की, फुटेरा वार्ड नंबर-4 मध्ये राहणारे कमलेश विश्वकर्मा आणि पथरियाच्या खजरी बिलानीची रहिवासी रोशनीचे लग्न 24 एप्रिलला झाले होते. तीन दिवसांपूर्वीच रोशनी माहेरवरून सासरी गेली होती. त्यानंतर संध्याकाळी तिने आपल्या रूममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. 

 

पती म्हणाला- जवळ येत नव्हती, म्हणायची तू आवडत नाहीस 
पती कमलेशने सांगितले की, लगुननंतर मला पाहण्यासाठी रोशनीच्या कुटुंबीयांनी मला तिच्या गावी बोलावले होते, त्यानतंर सगळ्यांनी पसंती दिल्यावर लग्न झाले. लग्न झाल्यावर रोशनी मला जवळ येऊ देत नव्हती. नेहमी म्हणायची तू आवडत नाहीस. दुपारी जेवण करण्यासाठी आलो होतो, तेव्हा सगले काही ठीक होते, नंतर काय झाले ते माहित नाही. 


परिसरातील लोकांनी शांत केला वाद
पोलिसांनी मृतदेह पोस्ट मॉर्टमसाठी नेल्यावर, दोन्ही पक्षांतील लोकांमध्ये वाद सुरू झाला. त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, नंतर त्यांचा आवाज ऐकून शेजारील लोकांनी वाद मिटवला. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...