आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 महिन्यांच्या अथक परिश्रमातून आदित्यने साकारला "मलंग" लूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'मलंग' चित्रपटासाठी आदित्य राॅय कपूरने प्रचंड मेहनत घाेतली आहे. नेहमी सडपातळ दिसणारा आदित्य या चित्रपटात सिक्स पॅक अॅब्जवाला आदित्य दिसणार आहे. या लूकसाठी त्याने जिममध्ये प्रचंड घाम गाळला आहे. यासाठी त्याने अनेक प्रोटीन्स घेतल्याचे समोर आले आहे. शिवाय ट्रेनर सुदर्शन डी अम्कर यानेदेखील मदत केली आहे. या चित्रपटासाठी मार्शल आर्ट आणि कलरीपायट्‌टूचे प्रशिक्षण घेतले आहे. याबरोबरच त्याने चांगला आहारही घेतला आहे. जाणून घेऊया बॉडीसाठी काय-काय केले.

  • दोन लूकमध्ये दिसणार

मलंगमध्ये आदित्य फक्त जाड नव्हे, तर सडपातळदेखील दिसणार आहे. चित्रपटाच्या एका भागात त्याला शांत आणि दुसऱ्या भागात त्याला किलर दाखवण्यात आले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अॅक्शनदेखील दाखवण्यात आली आहे. ज्यात आदित्य फाइट करताना दिसत आहे. यापूर्वी त्याने ते कधीच केले नाही.

  • घरीच सराव करण्यासाठी विकत घेतले ट्रेडमिल

आदित्यच्या तयारीविषयी सुदर्शन म्हणाला..., आदित्य आणि माझ्यात त्याच्या लूकविषयी बराच वेळ चर्चा झाली. तो म्हणाला मी माझ्या भूमिकेला न्याय देण्यासाठी कोणतीही मेहनत करायला तयार आहे. शिवाय सोबतच फायटिंग स्किल आणि लवचिक शरीरासाठी मार्शल आर्ट शिकणार आहे. शिवाय यात दोन लूक असतील असेही त्याने सांगितले होते. यानंतर आम्ही त्याला ट्रेनिंग देणे सुरू केले. यासाठी आम्ही काही कडक नियम बनवले. आम्ही रोज जिममध्ये २-३ तास घालवायचो. संध्याकाळी अर्धा तास कार्डियो करण्याचा सल्ला दिला. सोबतच त्याला ट्रेडमिल विकत घेण्याचे सांगितले. जेणेकरून तो घरीच सराव करू शकेल. वॉर्मअप करण्यासाठी आम्ही योगा करयचो. याशिवाय शरीर लवचिक करण्यासाठी त्याने कलरीपायट्‌टू आणि अनेक प्रकारचे मार्शल आर्ट्््सचे प्रशिक्षण घेतले. याव्यतिरिक्त स्टॅमिना वाढवण्यासाठी तो रोज ट्रेनिंग सेशननंतर २० मिनिटांपर्यंत पळायचा.

  • जंकफूड आणि पाण्यापासून दूर राहिला

आपल्या वर्कआऊट सेशनच्या व्यतिरिक्त आदित्यने आपल्या आहारातदेखील खूप बदल केला. तो राेज १५०० कॅलरी घेत होता, जेणेकरून वर्कआऊट करतान एनर्जीदेखील मिळू शकेल. या मर्यादित कॅलरीसेाबतच तो दिवसातून पाच वेळेस जेवण करायचा. यात साखर, ग्लूटन आणि जंकफूडचा समावेश नव्हता. शिवाय त्याला जास्त प्रमाणात मीठ आणि पाणी घेण्याची परवानगी नव्हती. शिवाय त्याला फळांचा ज्यूस पिण्याची परवानगी नव्हती.

  • आठ महिन्यांत आदित्य हे सर्व शिकले

- मार्शल आर्ट््स  - हँड टू हँड कॉम्बॅट - स्कूबा डायव्हिंग  - कलारीपयट्‌टू

बातम्या आणखी आहेत...