आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री ९ नंतर एटीएममध्ये रोख भरणा नाही; गृह मंत्रालयाचे नवीन निर्देश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- शहरातील एटीएममध्ये रात्री ९ नंतर रोख रक्कम जमा केली जाणार नाही. ग्रामीण भागात सायंकाळी ६ पर्यंत तर नक्षलप्रभावित भागात मात्र दुपारी ४ वाजेपर्यंतच पैशांचा भरणा केला जाणार आहे. याशिवाय रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या वाहनासोबत दोन शस्त्रधारी गार्ड असतील. गृह मंत्रालयाने हे नवीन निर्देश जारी केले. रोख व्यवहार करणाऱ्या खासगी संस्थांना लंच ब्रेकच्या आधीच रोख ताब्यात घ्यावी लागेल. बंदिस्त वाहनातच रोख रकमेची वाहतूक करता येईल. ८ फेब्रुवारी २०१९ पासून हे नवीन नियम लागू केले जातील. रोख रकमेची वाहतूक करणारी व्हॅन, एटीएममध्ये चोरी आणि फसवणुकीचे प्रकार वाढल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...