आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिहेरी अपघातानंतर कार पेटली, माय-लेकीचा होरपळून मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 गेवराई - परभणी-अहमदनगर महामार्गावर तिहेरी अपघातानंतर कारने पेट घेतल्याने एका गर्भवती महिलेसह ९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. सुदैवाने महिलेचा पती वाचला. हा अपघात कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावरील कोळगावजवळ मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला.


परभणी येथील ज्ञानेश्वर जाधव (४० ) हे पत्नी मनीषा (३५) व मुलगी लावण्या (९) यांना  घेऊन परभणी येथून कारने नगरकडे एका लग्न सोहळ्यासाठी  निघाले होते.  दुपारी गेवराई तालुक्यातील कोळगावजवळ कारला  एका भरधाव जीपने धडक दिली. त्यानंतर पाठोपाठ एका दुचाकीनेही धडक दिली.  


या अपघातानंतर रस्त्याच्या खाली गेलेल्या कारने पेट घेतला. कारमधील ज्ञानेश्वर आणि लावण्या यांना काही तरुणांनी बाहेर काढले. मात्र नंतर आग भडकल्याने गर्भवती असलेल्या  मनीषा यांना कारमधून  लवकर बाहेर पडता आले नाही. त्यांचा कारमध्ये होरपळून  जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांसह वाटसरूंनी ज्ञानेश्वर आणि लावण्या यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना सायंकाळी पाच वाजता लावण्याचाही मृत्यू झाला.