आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After Akshay Kumar Now Vicky Kaushal Also Left The Movie 'Land Of Lungi' Due The Lake Of Dates

आधी अक्षय कुमार आणि आता विक्की कौशलने डेट्सअभावी सोडला चित्रपट 'लँड ऑफ लुंगी' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : विक्की कौशल तामिळ चित्रपट 'वीरम' च्या रिमेकमध्ये अजित कुमारची भूमिका साकारणार होता. याची निर्मिती साजिद नाडियाडवाला करत आहे आणि फरहाद सामजी हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे विक्की यावेळी या चित्रपटाचा भाग बनू शकणार नाही. 

 

विक्की तीन चित्रपटांमध्ये आहे व्यस्त... 
विक्कीच्या आधी हा चित्रपट अक्षय कुमारला ऑफर झाला होता. पण तो इतर चित्रपटात व्यस्त असल्याने त्याने या प्रोजेक्टमधून आपले हात काढून घेतले. यानंतर निर्माते आणि दिग्दर्शकांनी विक्की कौशलला या चित्रपटासाठी निवडले. विक्कीने ऑफर तर पटकन स्वीकारली पण अक्षयप्रमाणेच विक्किदेखील डेट्समध्ये अडकला आणि त्यालाही हा चित्रपट सोडावा लागला. मात्र अजून याची अधिकृत घोषणा झालेली नाही. विक्कीकडे यावेळी 'तख्त', 'उधम सिंह', 'सॅम मानेक शॉ' यांचा बायोपिक असे चित्रपट आहेत. तसेच त्याची हॉरर फिल्म 'भूत: द हॉन्टेड शिप' देखील याचवर्षी नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे. 

 

'वीरम' चा आधीही बनला आहे रिमेक...  
2014 मध्ये आलेला 'वीरम' ची कथा चार भावांच्या अवती भोवती फिरते आणि यामध्ये तमन्ना भाटियाने लीड रोल साकारला होता. चित्रपटाला चांगला रीस्पॉअन्स मिळाल्यानंतर हा चित्रपट आणखी काही भाषांमध्ये डब झाला होता. आता याचा हिंदी रीमेक बनवला जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...