आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MeTooचा प्रभाव/ अक्षय कुमारने कँसल केली हाउसफुल 4 ची शूटिंग, साजिद खानलाही सोडावा लागला चित्रपट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: आमिर खाननंतर आता अक्षय कुमारनेही सेक्शुअल हरॅशमेंटच्या आरोपांमध्ये अडकलेल्या लोकांसोबत काम करण्यास नकार दिला आहे. अक्षयच्या पोस्टनंतर साजिदने चित्रपटातून स्वतःला दूर केले आहे. अक्षयने आपल्या ट्विटरवर लिहिले की- 
"मी काल रात्रीच देशात परत आलो आहे आणि सर्व वृत्त वाचून खुप परेशान झालो. मी हाउसफुल-4 च्या प्रोड्यूसर्सची तपासणी होईपर्यंत शूटिंग कँसल करण्यास सांगितले आहे. यावर कठोर कारवाई केली गेली पाहिजे. मी कोणत्याही सिध्द अपराधीसोबत काम करणार नाही. ज्याच्यासोबत अत्याचार झाला आहे, त्यांचे बोलणे ऐकायला हवे आणि त्यांना न्याय मिळायला हवा."


अक्षयनंतर साजिद गेला दूर 
साजिद खाननेही ट्विटर हँडलवर एक पोस्ट करुन स्वतःला सर्व डायरेक्टरच्या पोस्टमधून दूर केले आहे. त्याने लिहिले की, "माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे माझे कुटूंब, मित्र आणि माझ्या फिल्मच्या मेंबर्सला दुःख पोहोचले आहे. जोपर्यंत सत्य समोर येत नाही तोपर्यंत मी चित्रपटापासून दूर जाणे हीच माझी जबाबदारी आहे. मी मीडिया आणि मित्रांना एकच अपील करतो की, जोपर्यंत सत्य समोर येत नाही, तोपर्यंत माझ्याविषयी काहीच जजमेंट देऊ नका."

 

 

 

pic.twitter.com/deSRvNnkAA

— Akshay Kumar (@akshaykumar) October 12, 2018
सीनियर जर्नालिस्टने लावले आरोप 
साजिदवर एका सीनियर जर्नालिस्टनेही आरोप लावले आहे. त्यांनी सांगितले की, अनेक वर्षांपुर्वी ती जेव्हा साजिदची मुलाखत घेण्यासाठी गेली होती, तेव्हा साजितने तिला जबरदस्ती किस केले होते. याच्या अनेक वर्षांनंतर जेव्हा जर्नालिस्ट साजिदला भेटली तेव्हा ती म्हणाली - तु तर खुप लठ्ठ झाली आहेस, मला तुला स्पर्श करणेही आवडणार नाही.

 

 

 

pic.twitter.com/qnD9W6aiLb

— Sajid Khan (@SimplySajidK) October 12, 2018
मॉडलने सांगितली कहाणी 
अजून एका मॉडल आणि अॅक्ट्रेस रेचेल व्हाइटने सांगितले की, एका भूमिकेच्या कारणास्तवर मी साजिदने मला घरी बोलावले, तेव्हा मला विचित्र वाटले. पण तेव्हा साजिद तिला म्हणाला की, तो त्याच्या आईसोबत राहतो, तेव्हा मॉडेल त्याला भेटायला गेली. पण साजिद तिथे एकटाच होता. नंतर साजिदने तिला आपल्या बेडरुममध्ये बोलावून घेतले आणि म्हणाला की, "तु बिकिनीमध्ये कशी दिसले मला दाखव, पाच मिनिट जर सिड्यूस करु शकली तर भूमिका मिळेल."

 

 

 

Appalled hearing multiple incidents of harassment and it is truly horrific to hear what these women have been through. Everyone involved in Housefull needs to take a firm stance on this issue. This cannot go on.

— Twinkle Khanna (@mrsfunnybones) October 12, 2018
ट्विंकलने लिहिले - जे ऐकले ते भितीदायक होते 
टिंवकल खन्नानेही आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले की, - "हरॅशमेंटच्या अनेक घटना ऐकूण हैराण आहे. हे ऐकण्यासाठी खुप भिती दायक आहे की, या महिला काय करत आहेत. हाउसफुलमध्ये सहभागी असणा-या प्रत्येकाने या मुद्द्यावर कठोर वागले पाहिजे. हे असेच सुरु राहू देऊ नये."

 

 

बातम्या आणखी आहेत...