आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After Alert Sri Lanka, The Terrorists Of 15 IS Entering The Country On The Target Of Terrorists ...?

अलर्ट/ श्रीलंकेनंतर भारत दहशदवाद्यांच्या निशाण्यावर, बोटीत सवार होऊन 15 आयएसचे दहशदवादी भारतात दाखल...?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुवनंतपुरम(केरळ)- गुप्तहेर खात्याने श्रीलंका आणि भारतच्या मध्ये असलेल्या समुद्रात आयसिसचे दहशदवादी असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 15 दहशदवादी बोटीतून भारतात येउ शकतात. ते समुद्राच्या मार्गाने श्रीलंकेतून लक्षद्वीपकडे येत आहेत. या अलर्टनंतर रविवारी कोस्टगार्डनी प्रत्येक संशयित बोटीवर लक्ष ठेवण्यासाठी शीप आणि सर्विलांस एअरक्राफ्ट तैणात केले आहेत. श्रीलंकेला लागेल्या समुद्राच्या सीमेवरही लक्ष दिले जात आहे.


केरळ पोलिसांनी किनारपट्टीवर असलेल्या जिल्ह्यामध्ये हायअलर्ट जारी केला आहे. सुत्रांकडून कळाले की, अलर्ट जारी केल्यामुळे तपास करणे हे सामान्य प्रक्रिया आहे, पण यावेळी दहशदवाद्यांची संख्यादेखील सांगण्या आली आहे. तर, किनारपट्टीच्या सुरक्षा विभागानने सांगितल्याप्रमाणे श्रीलंका अटॅक आणि 23 मे रोजी दहशदवादी असल्याचे अलर्ट आल्यानंतर सुरक्षा वाढवणे गरजेचे आहे.


श्रीलंका अटॅकपूर्वी दहशदवादी केरळमध्ये थांबले होते
आयसिसच्या दहशदवाद्यांनी ईस्टरच्या दिवशी (21 एप्रिल) श्रीलंकेत आठ सीरिअल ब्लास्ट घडवले होते. यात 250 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर केरळमध्ये हाय अलर्ट करण्यात आला आहे. एनआयएच्या तपासात समोर आले की, या ब्लास्टची प्लॅनिंग करण्यासाठी दहशदवादी काही दिवस केरळमध्ये थांबले होते.