अटक वॉरंटनंतर वाजतगाजत / अटक वॉरंटनंतर वाजतगाजत गेला पोलिस ठाण्यात, आईवडिलांनीही दिले आशीर्वाद, मग गेला तुरुंगात, हे होते कारण..

दिव्य मराठी वेब टीम

Oct 17,2018 12:45:00 PM IST

वडोदरा - सर्वसाधारणपणे पोलिस गुंडांची शहरातून धिंड काढतात, जेणेकरून त्यांना आपल्या कृत्याची लाज वाटावी. अटकेचे वॉरंट जारी होताच लोक पळून जाण्याचा विचार करतात, परंतु गुजरातच्या वडोदरामध्ये एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्यक्तीविरोधात कोर्टाने अटक वॉरंट जारी केले. पोलिस आरोपी़च्या घरी पोहोचले तेव्हा तो तेथे नव्हता. मग काही वेळाने तोच व्यक्ती वाजतागाजत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला आणि स्वत:ला अटक करवून घेतली.

पत्नीला पोटगी न दिल्याने निघाले वॉरंट
पोलिस म्हणाले की, हेमंत राजपूत आणि सुनीताचे लग्न झाले होते. लग्नांनंतर सुनीताला हेमंतच्या आईवडिलांपासून वेगळे राहायचे होते. तिने हेमंतकडे तसा हट्ट केला, पण तो आईवडिलांना सोडायला तयार झाला नाही. यावरून दोघांमध्ये भांडणे होऊ लागली. मग सुनीता आपल्या माहेरी निघून गेली. यानंतर सुनीताने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आणि हेमंतकडून पोटगी मिळवण्यासाठी खटला दाखल केला.


कोर्टाने सुनीताला दर महिन्याला 3500 रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला. परंतु हेमंतने रक्कम दिली नाही. ही रक्कम वाढून 95,500 रुपये झाली. सुनीताने रक्कम मिळवण्यासाठी पुन्हा कोर्टात अर्ज केला. यावर न्यायालयाने पुन्हा आदेश दिले, परंतु हेमंतने एक रुपयाही दिला नाही. यामुळे कोर्टाने हेमंतविरुद्ध अटक वॉरंट जारी केले.


मित्रांच्या खांद्यावर बसून वाजतगाजत गेला पोलिस ठाण्यात
रविवारी बापोड पोलिस अटक वॉरंट घेऊन हेमंतच्या घरी पोहोचले, परंतु तो घरी नव्हता. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना हेमंतला घेऊन पोलिस स्टेशनला येण्यास सांगितले. सोमवारी सकाळी हेमंतचे मित्र त्याच्या घरी पोहोचले. त्याला फुलांचा हार घालण्यात आला. मग मित्रांनी त्याला खांद्यावर बसवले आणि घरातून पोलिस स्टेशनला नाचतगात वरात काढली. विशेष म्हणजे, या मिरवणुकीत हेमंतचे आईवडील आणि शेजारीही आनंदाने सहभागी झाले.

आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन गेला तुरुंगात
हेमंतच्या या मिरवणुकीला पाहायला गर्दी जमा झाली, आवाज ऐकून पोलिसही ठाण्याबाहेर आले. तेव्हा हेमंतला पाहून तेही हैराण होते. हेमंतने आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद घेतले आणि मग स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. हेमंतला अटक झाल्यावर त्याच्या घरचे दु:खाऐवजी आनंदात होते.


म्हणाला- आईवडिलांना सोडायला सांगणाऱ्या पत्नीला पोटगीचा एक रुपयाही देणार नाही
पोलिसांनी हेमंतला कोर्टापुढे हजर केले. कोर्टाने त्याची 270 दिवसांसाठी तुरुंगात रवानगी केली. हेमंत म्हणाला की, माझी पत्नी सुनीताने त्याच्या आईवडिलांचा मानसिक छळ केला आहे. मला तुरुंगात जाणे मंजूर पण तिला पोटगीचा एक रुपयाही देणार नाही. तो म्हणाला की, सुनीता हॉस्पिटलमध्ये नोकरी करते, माझ्यापेक्षा जास्त कमावते.

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचे आणखी फोटोज...

X
COMMENT