आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अव्हेंजर नंतर आता OnePlus 7 सीरिजच्या जाहिरातीत दिसणार 'आयर्न मॅन'चा जलवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- प्रीमिअम स्मार्टफोन बनवणारी कंपनी 'OnePlus' ने नुकतेच आपल्या नव्या मार्केटिंग आणि ब्रँडच्या जाहिरातीसाठी 'आयर्न मॅन' आणि अॅव्हेंजर्स सीरिजचा सुपरहीरो रॉबर्ट डाउनीसोबत करार केला आहे. स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये OnePlus या स्मार्टफोनची भूमिका महत्वपूर्ण आहे. या कंपनीचा आपल्या ब्रँड फिलॉसॉफी ''नेव्हर सेटलवर'' विश्वास असून ती याच मार्गाने काम करते.

 

'OnePlus' नेहमीच आपल्या यूझर्सना वेगळे आणि चांगले फीचर्स देण्याचा प्रयत्न करते. म्हणून कंपनी रॉबर्टला आपल्यासोबत घेऊन  ब्रँडच्या विस्ताराचा प्रयत्न करत आहे. तसेच OnePlus ची क्रिएटिव्ह टीम या लोकप्रिय अमेरिकेच्या अभिनेत्यासोबत नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन (OnePlus 7 Series) च्या मोहिमेसाठी काम करत आहे. या लिंकवर जाऊन पाहू शकता आयर्न मॅनचा जलवा- https://www.youtube.com/watch?v=waPqXbyuHlY" rel="nofollow

 

रॉबर्ट डाउनीला जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानले जाते. त्यांचे अनेक चित्रपट टेक्नॉलॉजी आणि भविष्याचा वेध घेणारे असतात. त्यामुळे OnePlus साठी हा खूप महत्वाचा घटक आहे. रॉबर्ट डाउनी एक बहुमुखी व्यक्तीमत्व असून जगभर त्यांचे लाखो चाहते आहेत. याच गोष्टीचा फायदा कंपनीला होणार आहे.

 

या असोसिएशनबद्दल बोलताना, OnePlus चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पेटे लॉ यांनी सांगितले की, - OnePlus कोणतीही गोष्ट वेगळे करण्यात विश्वास ठेवते. रॉबर्ट डाउनीसोबत काम करताना त्यांचे काम आणि समर्पणाची झलक आमच्या विचारधारेशी मिळते. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आणि हा आमच्यासाठी एक असाधारण अनुभव होता. 

 

कंपनीविषयी आपले मत व्यक्त करताना रॉबर्ट डाउनी म्हणाला की, तंत्रज्ञानाला पुढे घेऊन जाणारा युवा ब्रँड 'onePlus 7 Pro' एक अतिशय चांगला फोन आहे. यांनी मला क्वालिटी आणि क्राफ्ट्समॅनशिपच्या सिद्धांतांच्या आधारावर एका योजनेत मदद करण्याचे आव्हान दिले होते. विशेष म्हणजे मला तंत्रज्ञानाची खूप आवड असल्यामुळे मी या मोहिमेत सहभागी झालो. या स्मार्टफोनमध्ये इनोव्हेटिव्ह डिझाइनचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हा फोन अधिक प्रभावशाली वाटतो.

 

OnePlus 7 Series च्या लॉन्चसोबतच Robert Downey Jr. ही जाहिरात भारत आणि चीनमध्ये पहायला मिळत आहे. OnePlus सोबत या अभिनेत्याचे काम करणे या ब्रँडच्या विकासात भर पाडणारा एक महत्वाचा घटक ठरणार आहे. कारण Robert Downey Jr. एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि यशस्वी कलाकार आहे. जगभर त्याचे लाखो चाहते आहेत. 

 

मार्केटिंग आणि ब्रँड जाहिरातीसाठी OnePlus ने तरूणांवर पूर्ण लक्ष दिले आहे. विशेष म्हणजे रॉबर्ट डाउनीला आपल्या ब्रँडसोबत जोडून onePlus ने सिद्ध केले आहे की आम्ही युझर्संना काही तरी नवीन देऊ शकतो. या कंपनीने 14 मे रोजीच OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro लॉन्च केले आहे. हा एक अल्ट्रा-प्रिमीअम स्मार्टफोन असून जो अनेक चांगल्या फिचर्समध्ये उपलब्ध आहे.

बातम्या आणखी आहेत...