आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After 'Bareli Ki Barfi' Ayushmann And Rajkumar Will Again Work Together In 'shubh Mangal Jyada Savdhan'

आयुष्मान आणि राजकुमार पुन्हा दिसणार एकत्र, 'बरेली की बर्फी'नंतर आता 'शुभ मंगल ज्यादा सावधान'मध्ये करणार धमाल 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 'बरेली की बर्फी'नंतर राजकुमार राव आणि आयुष्मान खुराणा पुन्हा एकदा सोबत काम करू शकतात. असे म्हटले जात आहे की, आयुष्मानचा आगामी चित्रपट 'शुभ मंगल ज्यादा सावधान'मध्ये प्रमुख भूमिकेसाठी राजकुमारची निवड करण्यात आली आहे. सूत्रांच्या मते, राजकुमारचे नाव या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होते. तथापि, सुरुवातीला त्याला ही भूमिका ऑफर झाली होती तेव्हा त्याने त्या वेळी यास नकार दिला होता. मात्र, आता निर्माते आनंद एल. राय त्याला या चित्रपटात काम करण्यासाठी राजी करण्यामध्ये यशस्वी झाल्याचे समजते. राजकुमार 'दोस्ताना २' करणार होता. त्यामुळे त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. दोन्ही चित्रपटांचा विषयदेखील थोडाफार सारखा आहे. 'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा समलैंगिक संबंधांवर आधारित आहे. शूटिंग सुरू होईल. निर्माते हा चित्रपट पुढच्या वर्षी व्हॅलेंटाइनला रिलीज करू शकतात. 

 

90 च्या दशकात या विषयावर आले होते दोन चित्रपट... 
- 1996 मध्येे आलेला 'बॉमगे' गे रिलेशन आधारित होता. 
- नंदिता दास यांचा 'फायर' देखील असाच चित्रपट होता. 
- 'बरेली की बर्फी'मध्ये दोघांची जोडी प्रेक्षकांना आवडली होती. 
- दोघे कलाकार सारखेच आहेत. वेगळ्या विषयावर असलेल्या चित्रपटांनाच अायुष्मान आणि राजकुमार निवडत असतात. 

 

तृतीयपंथीयांच्या मुद्द्यावरून उदार होत आहे बॉलीवूड...  
पूर्वी अशा प्रकारच्या विषयांवर तयार होणाऱ्या चित्रपटांवर बंदी घातली जात होती. तृतीयपंथी श्रेणीसाठी आतापर्यंत सिनेमा माध्यमामध्ये कोणताच पुरस्कार नाही. काही दिवसांपूर्वीच करण जोहरनेदेखील तृतीयपंथीयांवर आधारित आपला चित्रपट 'दोस्ताना २'ची घोषणा केली आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर आणि कार्तिक आर्यन प्रमुख भूमिका साकारताना दिसतील. एवढेच नाही तर अदा शर्माचा आगामी चित्रपट 'मॅन टू मॅन'मध्ये ती ट्रान्सजेंडरचे पात्र साकारताना दिसेल. 

 

कलाकार घेत आहेत रिस्क... 
यानंतर 'अलीगड', 'माय ब्रदर निखिल', 'डेढ इश्किया', 'गर्लफ्रेंड', 'आय एम', 'दोस्ताना', 'कपूर अँड संस' यातही अशीच कथा दाखवण्यात आली. इंडस्ट्रीतील मोठे-मोठे कलाकार आता या विषयावरील चित्रपटात काम करत आहेत. सोनम कपूर गेल्या वर्षी 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' मध्ये लेस्बियन प्रेमीची भूमिका साकारली होती.यापूर्वी माधुरी दीक्षित, हुमा कुरैशी, शबाना आजमी, नंदिता दास यांनी देखील अशा प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...