Home | Maharashtra | Mumbai | After coming to power, 28 per cent of the total tweets of Modi's Tweets are best wishes

पंतप्रधानपदी आल्यानंतर मोदींनी केलेल्या एकूण ट्विट्सपैकी 28 टक्के ट्विट शुभेच्छांचे 

विशेष प्रतिनिधी | Update - Feb 14, 2019, 09:08 AM IST

मनसेच्या फेसबुक लाइव्हमधून पोलखोल, भाजपचे उत्तर नाही 

 • After coming to power, 28 per cent of the total tweets of Modi's Tweets are best wishes

  मुंबई- सत्तेवर येण्यापूर्वी पेट्रोल दरवाढ, महागाई, शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार, प्रशासन, महिला अत्याचार आणि बेरोजगारी याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून भरभरून बोलणारे तसेच तत्कालीन सरकारची लक्तरे काढणारे नरेंद्र मोदी. मात्र, याच मोदींनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत या सर्व विषयांवर सोशल मीडियावर चुप्पी साधल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदींनी केलेल्या एकूण ट्विट्सपैकी तब्बल २८ टक्के ट्विट्स हे विविध मान्यवरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी केल्याचेही समोर आले आहे. २०१० ते २०१८ या आठ वर्षांच्या कालावधीत मोदींनी हाताळलेल्या विषयांचा लेखाजोखाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फेसबुक लाइव्हद्वारे आकडेवारीच सादर केली आहे. दरम्यान, शेतकरी आत्महत्येवर त्यांनी एकही टि्वट केले नाही.

  सत्तेवर येण्यापूर्वीच्या ४ वर्षांच्या काळात फक्त ३ हजार ९०० ट्विट्स करणाऱ्या मोदींनी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्याच्या १३ हजार ९९० ट्विट्स केले. एका ट्विटला लागणारा सरासरी वेळ लक्षात घेता १९ दिवस ४ तास कालावधी मोदींनी ट्विटरवर घातला .

  २०१० ते २०१४ या कालावधीत केलेले ट्विट्स - ३ हजार ९००
  २०१४ ते २०१८ या कालावधीत केलेले ट्विट्स - १३ हजार ९९०


  यासाठी २७ हजार ९८० मिनिटे म्हणजेच जवळपास वीस दिवस त्यांनी फक्त ट्विटरवर घालवली.

Trending