आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : इरफान खानचे फॅन्स खूप मोठ्या काळानंतर त्याला 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहणार आहेत. चित्रपटाचे शूटिंग संपले आहे. डायरेक्टर होमी अदजानियाने इरफानसोबत फोटो शेअर करून रॅपअपची घोषणा केली. या फोटोमध्ये इरफान, होमीच्या खांद्यावर आराम करताना दिसत आहे. हे शेअर करत होमीने एक खूप इमोशनल मॅसेजदेखील लिहिला आहे.
कास्ट आणि क्रू मेंबरच्या मदतीने पूर्ण झाला चित्रपट - होमी...
डायरेक्टरने कॅप्शनमध्ये लिहिले, 'इरफान खान तुम्ही अविश्वसनीय आहात. तुम्ही एक सभ्य अभिनेतेदेखील आहात. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो.' पुढे होमीने लिहिले, 'मला प्रत्येक परिस्थितीत हा चित्रपट बनवायचाच होता. हा बनवणे अशक्यच वाटत होते. पण हा चित्रपट बनला. हा चित्रपट बनवणे एक खूप भावुक प्रवास होता. चित्रपटातील कास्ट आणि क्रू मेंबरला धन्यवाद म्हणू इच्छितो, ज्यांनी हा चित्रपट पूर्ण करण्यात मदत केली.'
होमीची इंस्टापोस्ट...
इरफानसाठी लंडनमध्ये शूट झाला चित्रपट...
कॅन्सरसोबतचे युद्ध जिंकल्यानंतर 'अंग्रेजी मीडियम' इरफानचा कमबॅक चित्रपट आहे. अभिनेत्याला कामासोबतच डॉक्टर्सचे उत्तम उपचार मिळू शकतील यासाठी चित्रपटाचा खूप मोठ्या भागाचे शूटिंग लंडनमध्ये केले गेले. यामध्ये करिना कपूर लंडन पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. तसेच राधिका मदान, डिंपल कपाड़िया, दीपक डोबरियाल आणि मनु ऋषी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. राधिका इरफानच्या मुलीची भूमिका साकारत आहे, जी शिकण्यासाठी लंडनला जाते. चित्रपट पुढच्यावर्षी रिलीज होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.