आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूनंतर केस आणि नखे वाढतात की नाही, जाणून घ्या सत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजात अनेक समज-गैरसमज प्रचलित असतात. अनेकदा काहीही आधार नसताना आपण ते खरे मानू लागतो. माणसाच्या मृत्यूनंतर शरीर सुरक्षित ठेवल्यास त्याचे केस आणि नखे वाढत राहतात, हा समज त्यातलाच एक. पण हे पूर्णपणे खोटे आहे. 


चिकित्साशास्त्रानुसार, ऊर्जेविना शरारीत कोणताही भाग विकसित होऊ शकत नाही. मृत्यूपूर्वी हळूहळू प्रत्येक अवयव निकामी होऊ लागतो. आधी श्वासोच्छ्वास बंद होतो. नंतर हृदय बंद पडते. परिणामी मेंदू आणि शरीरातील ऑक्सिजन पुरवठा बंद होतो. पेशी झपाट्याने मृत होऊ लागतात. या स्थितीला 'पॉइंट ऑफ नो रिटर्न' असे म्हणतात. मृत्यूनंतर शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा आक्रसते. यामुळे केस आणि नखे थोडी वर आलेली अर्थात मोठे झालेली दिसतात. त्वचेच्या पेशी १२ तास जिवंत राहतात. रक्तपुरवठा थांबताच त्वचा आकसते. 


चिकित्साशास्त्रानुसार, मृत्यूनंतर पेशींना होणारा ग्लुकोजचा पुरवठा थांबतो. त्यामुळे नखे वाढूच शकत नाहीत. केसांबाबतही असेच आहे. प्रत्येक केसाच्या खालील त्वचेत काही नव्या पेशी बनत असतात. त्यामुळे आपले केस वाढत असतात. रक्ताभिसरण थांबताच केस वाढणेही बंद होते. त्यामुळेच मानवी अवयवांचे प्रत्यारोपण करण्यासाठी मृत्यूनंतर अर्ध्या तासातच अवयव काढले जातात. पुढील सहा तासांत ते प्रत्यारोपित केले जातात. 

बातम्या आणखी आहेत...