आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 महिन्यांपूर्वी नदीत बुडून 2 भावांचा झाला होता मृत्यू, 40 दिवसांनी मोबाईलचे लॉक उघडल्यानंतर समोर आले सत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कपूरथला - 3 महिन्यांपूर्वी व्यास नदीत अंघोळ करताना दोन चुलत भावांचा नदीत बुडून मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता नवीन वळण लागले आहे. दोघांना मृत्यू बुडून झाला नसून त्यांना बुडवून मारल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मारणारेही गावातीलच दोन तरुण असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. हे दोन तरुण मुलांना फिरवण्यासाठी म्हणून घेऊन गेले होते. पण नंतर व्यास नदीमध्ये घेऊन गेले. कुटुंबीयांना पुरावा मिळू नये म्हणून दोघांनी एका मृताचा मोबाईल लॉक करून फेकला. या मोबाईलचे लॉक आता उघडले. त्यानंतर त्यातील सेल्फीवरून दोघे एकटे नव्हते तर त्यांच्याबरोबर गावातील आणखी दोन तरुण होते अशी माहिती मिळाली आहे. त्या दोघांवर हत्येचा संशय आहे. 


कुटुंबीय म्हणाले, पोलिस बोलावतात पण न्याय मिळत नाही 
कुटुंबाला याबाबत खुलासा होऊन 40 दिवस झाले आहेत. कुटुंबाने आरोप केला आहे की, त्यांनी 40 दिवसांत जवळपास 20 वेळा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. पोलिस त्यांना बोलावतात पण न्याय देत नाहीत. सोमवारी कुटुंबीय पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते, पण ते शक्य होऊ शकले नाही.  

 
बुडून मृत्यू झाल्याचा होता संशय 
गुरप्रित सिंग (18) आणि त्याचा चुलत भाऊ सवरण सिंग (21) दुपारी अंघोळ करताना नदीत बुडाल्याची घटना घडली होती. कुटुंबाला या घटनेबाबत संध्याकाळी माहिती मिळाली. रात्री 9 वाजता पोलिस घटनास्थळी पोहोचले. घटनेच्या वेळी कुटुंबीयांना नदीच्या किनाऱ्यावर दोघांची बाईक, कपडे आणि 1 मोबाईल तसेच बूट आढळले होते. दोघे नदीत अंघोळीसाठी गेले होते. खोल पाण्यात गेल्याने ते वाहून गेले असावे असा गावातील लोकांना संशय आहे. 2 दिवसांनी दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगलेले आढळले होते. एका तरुणाचा मृतदेह जळालेला होता. पोलिसांनी पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला होता. 

बातम्या आणखी आहेत...