• Home
  • Business
  • Gadget
  • After December 31, WhatsApp will be closed on millions of smartphones, Windows smartphone will start

काउंटडाउन सुरू / 31 डिसेंबरनंतर लाखो स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप होईल बंद, विंडोज स्मार्टफोनपासून सुरुवात

  • 1 जानेवारीपासून कोणत्याच विंडोज स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही
  • 1 फेब्रुवारीपासून आयफोन आणि अँड्रॉयडच्या जुन्या ओएसनरही व्हॉट्सअॅप बंद होईल

दिव्य मराठी वेब टीम

Dec 11,2019 02:08:00 PM IST

गॅजेट डेस्क- व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या लाखो युजर्ससाठी वाईट बातमी आहे. कंपनीने 31 डिसेंबर, 2019 नंतर जगभरातील लाखो स्मार्टफोनवर व्हट्सअॅप बंद करण्याची घोषणा केली आहे. व्हॉट्सअॅपची पॅरेंट कंपनी फेसबुकने सांगितले की, 31 डिसेंबरनंतर विंडोज स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅपला नेहमीसाटी बंद करण्यात येणार आहे. यासोबतच काही अँड्रॉयड आणि आयफोनवरही व्हॉट्सअॅप बंद होणार आहे.


फेसबूकने दिली माहिती


फेसबूकने याबाबत सांगितले की, 2020 च्या सुरुवातील जगभरातील अनेक स्मार्टफोनमधून व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. तसेच, 1 फेब्रुवारीपासून जुने 2.3.7 व्हर्जन ओएस असलेल्या अँड्रॉइड आणि आयओएस 8 पेक्षा कमी असलेल्या ओएसमधून व्हॉट्सअॅप हद्दपार होणार आहे.

X
COMMENT