आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर ४ ते ६ मिनिटांनी मोबाइल पाहतात भारतीय लोक; जगात सर्वात कमी झोप घेणारे भारतीयच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
७ वर्षांच्या मुलाची वडिलांच्या विरोधात निदर्शने - Divya Marathi
७ वर्षांच्या मुलाची वडिलांच्या विरोधात निदर्शने

जगातील दोन तृतीयांश लोकसंख्या म्हणजेच ५०० कोटींपेक्षा जास्त मोबाइल वापरते. यात १०० कोटींवर तर एकट्या भारतात आहे. स्मार्टफोन युजर्सची संख्या मात्र कमी आहे. संशोधन करणाऱ्या ई-मार्केटरनुसार, वर्षाच्या शेवटी स्मार्टफोन युजर्सची संख्या ३३.७ कोटी असेल. यात वार्षिक सरासरी १६% म्हणजे सर्वाधिक वाढ होत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्सच्या अहवालानुसार, तरुण रोज ६ तासांपर्यंत फोन वापरतात. 


७ वर्षांच्या मुलाची वडिलांच्या विरोधात निदर्शने
जर्मनीत हॅम्बुर्गमध्ये ७ वर्षीय एमिलने ८ सप्टेंबरला निदर्शने केली. वडील व जे पालक मोबाइलला जास्त वेळ देतात त्यांच्याविरुद्ध हे आंदोलन होते. याचे स्लोगन होते- ‘प्ले विथ मी, नॉट विथ युवर सेलफोन’.


सर्व्हे डोळे उघडण्यासाठी महत्त्वाचा
- ७४% स्मार्टफोन युजर्स हातात मोबाइल घेऊनच झोपी जातात. -केआरसी संशोधन
- २-६ तास मोबाइलवर वेळ घालवत आहेत देशातील ४०% स्मार्टफोन युजर्स  -सीएमआर इंडिया
- १५० वेळा दिवसभरात (सरासरी) फोन चेक केला जातो. म्हणजेच ६ मिनिटांनी एकदा -आयसीएसएसआर


महिला-किशोरवयीन मुलांची स्थिती वाईट
- महिला स्मार्टफोन युजर २९% कमी, पण फोनला सरासरी १४ मिनिटांपेक्षा जास्त वेळ देतात. ८०% वेळ फक्त सोशल साइट्सवर, यू-ट्यूबवर पुरुषांपेक्षा दुप्पट. 
- ७८% किशोरवयीन ४ तास फोनवर असतात. १४% जणांना डोकेदुखी, अनिद्रा, चक्कर येण्याची समस्या.


४ लक्षणांद्वारे कळते तुम्ही फोनच्या आहारी
- ६७% स्मार्टफोन युजर घंटी वाजली नाही, मेसेज किंवा नोटिफिकेशन आले नाही तरी फोन पाहतात.  
- एखादी चिंता सतावत असली तरी फोनचा वापर सुरू करतात. 
- नेटवर्क नसल्यास राग, चिंता, चिडचिडेपणा, अस्वस्थता वाढते. 
- वेळ मिळताच फोन पाहण्याची सवय असल्यास तुम्ही फोनच्या आहारी गेलात समजा. 
स्रोत : रेडिअोलॉजिकल सोसायटी ऑफ नॉर्थ अमेरिका(सायन्स डेली)


...आणि ४ पद्धती सुटकेसाठी 

लॅरी रॉसेन, मनोविकार प्राध्यापक(कॅलिफोर्निया स्टेट युनि.)
 

पुश नोटिफिकेशन ऑफ ठेवा : केवळ आवश्यक अॅपचे नोटिफिकेशन ऑन ठेवायला हवेत. 
- ऑनलाइन व्यग्रता ६०% घटणार.


अलार्म घड्याळ विकत घ्या: फोनचा अलार्मसाठी वापर नको. झोपताना फोन जवळ बाळगू नका.
- ४३% लोक उठताच १२ मिनिटांपर्यंत फोन पाहतात. 


होम स्क्रीनवर कामाचे अॅप : फेसबुक, इन्स्टाग्राम यासारखे अॅप होम स्क्रीनवर ठेवू नयेत. 
- सोशल मीडिया व्यग्रता २०% पर्यंत कमी होणार 


वेळापत्रक बनवा : काही दिवस १५ मिनिटे, नंतर  ३० मिनिटांनंतर फोन चेक करणे सुरू करा.
- तर ७३% लोक याच्या आहारी जाणार नाहीत.

 

बातम्या आणखी आहेत...