आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेटवर बेशुद्ध पडली गहना वशिष्ठ, आयसीयूत मृत्युशी दितेय झुंज, 36 तासांत केवळ एक एनर्जी ड्रिंक पिऊन करत होती शूटिंग

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः  अभिनेत्री गहना वशिष्ठची प्रकृती गंभीर असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी 21 नोव्हेंबर रोजी मड आयलँड येथे ती एका वेबसीरिजचे शूटिंग करत होती. शूटिंग सुरु असताना ती खाली कोसळली.  तत्काळ तिला रक्षा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिच्यावर आयसीयूत उपचार सुरु असून तिची प्रकृती अतिशय नाजूक असल्याचे समजते.

श्वासोच्छवास घेण्यास त्रास... 
गहनावर उपचार करणारे  डॉ. प्रणव काबरा यांनी सांगितल्यानुसार, गहना प्रथमोपचारांना प्रतिसाद देत नव्हती. तिला श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यामुळे तिला व्हेंटिलेटर आणि अन्य सोपर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले आहे. 

48 तासांपासून काही खाल्ले नव्हते..
डॉ. प्रणव यांनी सांगितल्यानुसार, काहीही पौष्टिक न खाता केवळ एनर्जी ड्रिंक्स घेऊन ती 48 तास शूटिंग करत होती.  ती डायबिटीजची रुग्ण असून तिची शुगर लेव्हल खूप वाढली आहे, तर बीपी लो झाला आहे. सध्या तिच्या प्रकृतीविषयी अधिक काही सांगता येणार नाही. आम्ही तिच्या रिपोर्ट्सची वाट बघत आहोत.  रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, गहना तिच्या मेल को-स्टार्ससोबत ग्लॅमरस सीन शूट करत होती. शूटिंगदरम्यान तिने फक्त एक एनर्जी ड्रिंक घेतले होते. 

'गंदी बात'मध्ये झळकली होती गहना..
गहनाच्या अभिनय करिअरविषयी सांगायचे म्हणजे, तिने स्टार प्लसवरील 'बहनें' या शोमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. गहना 2012 मध्ये मिस एशिया बिकिनी कॉन्टेस्टची विजेती ठरली होती.  याशिवाय गेल्या पाच वर्षांत तिने 30 हून अधिक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे.  अलीकडेच ती आल्ट बालाजीच्या 'गंदी बात' आणि उल्लू ऐपच्या शोजमध्ये झळकली होती.  

बातम्या आणखी आहेत...