आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : सध्या लग्नाचे सीजन आहे. म्हणजे हे की, लग्न होणे आणि न होण्याच्या विषयावर अनेक चित्रपट येत आहेत. उदाहरण म्हणून अशातच रिलीज झालेले 'उजड़ा चमन' आणि 'बाला'. तसेच 'मोतीचूर चकनाचूर' आणि 'जबरिया जोडी' हेदेखील. मजेशीर बाब ही आहे की, ज्या विषयावर 'जबरिया जोडी' बनला होता, त्याच विषयावर आणखी एक चित्रपट येत आहे. ज्यामध्ये अक्षय खन्ना तरुणांचे जबरदस्ती लग्न लावून देताना दिसत आहे.
चित्रपटाशी निगडित सूत्रांनी याची माहिती दिली आहे. यामध्ये मेन लीडमध्ये पद्ममिनी कोल्हापुरे यांचा मुलगा आणि रवि किशनची मुलगी रीवा आहे. चित्रपटाचे लेखन रायटिंग बृजेंद्र कालाने केले आहे, जे मूळ स्वरूपाने हास्य कलाकार आहेत. चित्रपटाचा बॅकड्रॉपदेखील 'जबरिया जोडी' प्रमाणेच बिहारमध्ये सेट लावला आहे. मेकर्सचा दावा आहे की, या चित्रपटाची कन्सेप्ट 'जबरिया जोडी' च्या आधी कंसीव्ह केली गेली होती.
प्रोड्यसूर न मिळाल्यामुळे झाला उशीर...
प्रोड्यूसर मिळण्यात उशीर झाल्यामुळे हा चित्रपट बनण्यात उशीर झाला. मात्र 'जबरिया जोडी' च्या तुलनेत या कथेचा सूर वेगळा आहे. प्रोडक्शनशी निगडित सूत्रांचे म्हणणे आहे की, त्यामध्ये हिरोच जबरदस्ती लग्न लावून देतो. येथे अक्षय खन्ना, बाबा भंडारी बनला आहे. बाबा भंडारीच हीरो-हीरोइनचे जबरदस्ती लग्न करून देतो. स्वतःपेक्षा खूप लहान वयाच्या मुलीसोबत बाबा भंडारीचा लव्ह अँगलदेखील यामध्ये दाखवला जाणार आहे. बाबा भंडारीचा टोन बहुतांश 'हलचल’ चित्रपटातील जीतूसारखा आहे. आतापर्यंत अक्षय खन्ना सलग व्हिलन आणि इंटेन्स कॅरेक्टर करत होता.
ट्रेड पंडितांचे म्हणणे आहे की, बॉलिवूडमध्ये वेडिंग कॉमेडीचे ट्रेंड आहे. 'लुकाछुपी' च्या यशामुळे या जॉनरच्या चित्रपटात अनकेजण हात अजमावत आहेत. 'मोतीचूर चकनाचूर' नंतर नवाजुद्दीन सिद्दीकी आणखी वेडिंग जॉनर च्या चित्रपटांची डिमांड करत आहे. किआरा आडवाणीच्या 'इंदु की जवानी' मध्येदेखील याचाच तडका आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.