आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After Film Now Deepika's Advertisements Also Boycott, '#Remove Deepika_Save LUX' Is Trending

'छपाक' नंतर आता दीपिकाच्या जाहिरातींनाही बॉयकॉट, '#दीपिका हटवा LUX वाचवा' करत आहे ट्रेंड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क - दीपिका पदुकोणच्या जेएनयू व्हिजिटला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी 'छपाक' च्या रिलीजपूर्वी उचलेले हे पाऊल धाडसी असल्याचे म्हणाले आहे तर सोशल मीडियावर लोकांनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हणत तिची निंदा केली आहे. 'छपाक' आणि दीपिकाला बॉयकॉट करण्याचा ट्रेंडदेखील सोशल मीडियावर खूप चालला. आता हा वाद केवळ 'छपाक' चित्रपटापर्यंतच मर्यादित राहिलेला नाही. दीपिका जे ब्रँड्स प्रमोट करते, तेदेखील बॉयकॉट करण्याची मोहीम सोशल मीडियावर सुरू झाली आहे.


इकॉनोमिक टाइम्समध्ये छापलेल्या रिपोर्टनुसार, जे ब्रँड्स दीपिका प्रमोट करते ते काही दिवस त्याच्या जाहिराती दाखवणे टाळत आहेत किंवा त्या अगदी कमी दाखवल्या जात आहेत. 

#दीपिका_हटवा_LUX_वाचवा करत आहे ट्रेंड

दीपिका ब्यूटी सोप लक्सची ब्रँड अॅम्बेसीडर आहे. अशात सोशल मीडियावर तिला लक्समधून हटवण्याची मोहीमही सोशल मीडियावर सुरू झाली आहे. सोशल मीडियावर #दीपिका_हटवा_LUX_वाचवा ट्रेंड करत आहे. अनेक यूजर्स मीम शेअर करत आहेत आणि दीपिकाला लक्समधून हटवण्याची मागणी करत आहेत.  

23 ब्रँड्स एंडोर्स करते दीपिका... 

दीपिका लक्सव्यतिरिक्त अॅक्सिस बँक, रॉयल अॅटमस, विस्तारा, केलॉग्स, नेस्कॅफे, ब्रिटानिया, जिलेट व्हीनस, गोआयबीबो, कोका-कोला, तनिष्क, ओप्पो, जेगुआर लायटिंग, लोरियाल पॅरिस, जिओ, नेस्ले फ्रुइटा व्हायटल्स, टेटली ग्रीन टी, लायड एसी, मिंत्रा-ऑल अबाउट यू यांसारखे अनेक ब्रँड्स एंडोर्स करते. ती जाहिरातींसाठी 8-10 कोटी रुपये चार्ज करते. 
 

'छपाक'साठी घेतली 26 कोटींची फी 

दीपिका सध्या सर्वात जास्त फी घेणारी अभिनेत्री आहे. 'छपाक' चित्रपटासाठी तिला 26 कोटी रुपये फी मिळाली आहे. 2018 मध्ये फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, तिचे नेटवर्थ सुमारे 100 कोटी रु. होती. 

बातम्या आणखी आहेत...