आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाेषणाचा सहावा दिवस : लाेकायुक्त, लाेकपालसाठी अण्णा अाक्रमक, \'पद्मभूषण\' परत करण्याचा इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - लाेकायुक्त, लाेकपाल नियुक्तीसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गेल्या ५ दिवसांपासून राळेगण सिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपाेषण सुरू अाहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी त्यांची भेट घेऊन चर्चा केली व उपाेषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, अाता केवळ अाश्वासनांवर विश्वास ठेवणार नाही, जाेपर्यंत निर्णय हाेत नाही ताेपर्यंत उपाेषण मागे घेणार नाही, असे अण्णांनी महाजन यांना ठणकावून सांगितले. त्यामुळे ते अाल्यापावली परत गेले. साेमवारी पुन्हा महाजन व अण्णांची चर्चा हाेणार अाहे. दरम्यान, ८ फेब्रुवारीपर्यंत अापल्या मागण्यांवर सरकारने निर्णय न घेतल्यास 'पद्मभूषण' पुरस्कार परत करू, असा इशाराही अण्णांनी पत्रकार परिषदेत दिला, त्यामुळे भाजप सरकारसमाेर अडचणी वाढल्या अाहेत. अण्णांशी चर्चेनंतर राळेगण सिद्धीतील शेतकऱ्यांनी मंत्री महाजन यांना अामच्याशी चर्चा करावी, अशी मागणी केली. कांद्याच्या भावाचे काय झाले,असे प्रश्न त्यांना विचारले. त्यावर महाजन यांनी वेळ मारून नेली. अाता सरकारने मजुरांना पेन्शन योजना सुरू केल्याने ते म्हणाले. त्यावर एका शेतकऱ्याने 'तुमचे सहा हजार नको, दरवर्षी आमच्याकडून सहा हजार घ्या. मात्र, आम्हाला स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे भाव द्या', अशी मागणी केली. त्यावर स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी संसदेत मंजूर करण्यात आल्या असून या शिफारशींप्रमाणे मका, कापूस, सोयाबीन, धान आदी शेतमालाची दीडपट हमीभावाने खरेदी केली जात आहे. साठ वर्षांवरील शेतमजुरांना तीन हजार रुपये पेन्शन योजनाही लागू झाली अाहे, असे महाजन यांनी सांगितले. मात्र, पाच दिवसांनंतरही अण्णांच्या उपोषणाबाबत तोडगा काढू न शकल्यानेही त्यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले. प्रश्नांच्या सरबत्तीने गाळण उडालेल्या महाजन यांनी अखेर तेथून काढता पाय घेतला. 


सरकार अण्णांनाच विसरले 
पाच दिवस उलटूनही अण्णांच्या अांदाेलनाकडे दुर्लक्ष करणारे सरकार कोणत्याही विषयात गंभीर नाही. मागण्यांबाबत सरकारने अण्णांना अनेकदा अाश्वासने दिली, मात्र त्याचे अाजवर पालन झाले नाही. यूपीए सरकारच्या काळात अण्णांनी जनआंदोलन केले. त्याचा फायदा घेऊन सत्तेवर अालेले लाेक अाज अण्णांनाच विसरले. मुळात देशातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांसंदर्भात निर्णय घेण्याबाबत सरकारची इच्छाशक्तीच नाही. - राधाकृष्ण विखे पाटील, विराेधी पक्षनेते. 

 

ग्रामस्थांनी धारेवर धरल्यानंतर निरुत्तर मंत्री महाजनांचा काढता पाय 
सूचनेनुसारच कायदा, अाज ताेडगा 

शेतमालाचे भाव, शेतमजुरांना पेन्शन आदींबाबत मुख्यमंत्र्यांचे पत्र अण्णांना मी दिले. १९७१ चा लोकायुक्त कायदा कुचकामी आहे. तो अधिक प्रभावी, शक्तिशाली झाला पाहिजे, अशी अण्णांची मागणी अाहे. त्यांच्या सूचनेनुसारच मसुदा तयार करून संसदेत नवीन कायदा तयार केला. राज्यानेही ताे स्वीकारला. अण्णांच्या मागणीप्रमाणे पाच शासकीय व पाच निमशासकीय सदस्य त्यात आहेत. साेमवारी पुन्हा अण्णांशी चर्चा करून ताेडगा काढू. - गिरीश महाजन, मंत्री 

प्रकृती बिघडली : ५ व्या दिवशी अण्णांचे वजन ४ किलाे घटले. अण्णांना रुग्णालयात दाखल करावे लागेल, असे डाॅक्टर म्हणाले, तर पुणे- नगर महामार्गावर रास्ता राेकाे केल्याने ११० जणांना ताब्यात घेतले गेले. 

 

अण्णांच्या जिवाशी खेळू नका : उद्धव 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपाेषणाला पाठिंबा दिला. 'सरकारने अण्णांच्या जिवाशी खेळू नये, उपाेषणाची दखल घ्यावी. पीएमनी त्यांच्या 'आमरण उपोषणास' शुभेच्छा देणारे पत्र पाठवावे हा प्रकार संतापजनक, तितकाच हास्यास्पद अाहे. उपोषण करून प्राणत्याग करण्यापेक्षा अण्णांनी रस्त्यावर उतरावे, शिवसेना साेबत अाहे,' असे ठाकरे म्हणाले. 

ग्रामविकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेत १९९० मध्ये अण्णांना पद्मश्री, तर १९९२ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन गाैरवले हाेते. 


अाश्वासने नकाेत; तातडीने निर्णय घ्या 
महाजन यांनी नुसतेच पत्र दिले? अाश्वासनांची पूर्तता कधी करणार? ८ किंवा ९ फेब्रुवारीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास पद्मभूषण पुरस्कार परत करू. आजवर १९ उपोषणे केली. सलग १५ दिवसांचे उपाेषणही केले. त्यामुळे अजून पाच दिवस माझ्या प्रकृतीस काहीही हाेणार नाही. सरकारने यासंदभार्त तातडीने निर्णय घ्यावा, मागण्या मान्य होईपर्यंत अापण उपोषण मागे घेणार नाहीच. - अण्णा हजारे, पत्रकार परिषदेत 

 

बातम्या आणखी आहेत...