आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After Heena Khan, This TV Actress Make Debu In Cannes Film Festival And Meet AR Rahman

Cannes Film Festival : हिना खाननंतर आता या टीव्ही अभिनेत्रीचा कान्समध्ये डेब्यू, एआर रहमान यांना भेटली 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बुधवारी टीव्ही अभिनेत्री हिना खानने कान्सच्या रेड कारपेटवर डेब्यू केला. हिना खानच्या कान्स लुकने टीव्ही सेलेब्स आणि फॅन्सला इंप्रेस केले आहे. हिना खानव्यतिरिक्त कान्समध्ये आणखी एका सेलेब्रिटीची एंट्री झाली आहे. ही सेलेब्रिटी दुसरी कुणी नाही तर स्टार कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीरा शाह आहे. कश्मीरा शाह 72 व्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये इंडियन पवेलियनचे उद्धाटन करण्यासाठी आली होती. तिथे कश्मीरा शाह स्पीकरदेखील आहे. याव्यतिरिक्त कश्मीराचा चित्रपट ''मरने भी दो यारो'' चा प्रोमोदेखील कान्समध्ये रिलीज केला जाणार आहे. कश्मीराने इंस्टावर आपला फर्स्ट लुक शेयर केला आहे. जेथे ती ब्लू ड्रेसमध्ये दिसत आहे. 

 

फोटो शेयर करून कश्मीराने लिहिले, 72 व्या कान्स फेस्टिवलमध्ये काल माझा डेब्यू झाला. जिथे मी इंडियन पवेलियनचे उद्धाटन केले. Q&A सेशनमध्येही स्पीकर होते. ज्याचा टॉपिक होता, परदेशी फिल्ममेकर्ससाठी भारत शूटिंग प्लेस का असले पाहिजे ? कसे आपण परदेशी मेकर्ससाठी भारतात शूटिंग करणे सोपे बनवू शकतो ? मला या पॅनलचा भाग होऊन खूप अभिमान वाटत आहे..कश्मीराने हा फोटो शेयर करून लिहिले, कान्समध्ये माझे पहिले वर्ष. आश्चर्य आहे की, अभिनेत्री म्हणून मी येथे येऊ शकले नाही. पण डायरेक्टर म्हणून कान्समध्ये येण्याची संधी मिळाली आहे. मी माझ्या फिल्मला कान्समध्ये आणले नाही, तर माझ्या चित्रपटानेच मला कान्समध्ये आणले आहे. 

 

कश्मीराचा पती कृष्णा अभिषेकने पत्नीचा सिंगर एआर रहमानसोबतच एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, 'कश्मीराला शुभेच्छा की, ती कान्समध्ये आपली फिल्म ''मरने भी दो यारो'' चा प्रोमो रिलीज करणार आहे. एक प्रोड्यूसर म्हणून या फिल्मचा भाग बनणे मोठी अचीवमेंट आहे. तू संपूर्ण टीमला गर्व वाटण्यासारखे काम केले आहे. यापूर्वी हिना खान कान्सच्या रेड कारपेटवर स्टनिंग लुकमध्ये दिसली. मात्र कश्मारा रेड कारपेटवर चालली नाही. पण टीव्हीशी निगडित या अभिनेत्रींचे कान्ससारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपल्या देशाला रिप्रेजेंट करणे खूप मोठी अचिव्हमेंट आहे. 

बातम्या आणखी आहेत...