आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या निधनानंतर एसटी वर्कशॉपमध्ये काम करत 'ती'ने मुलींना शिकवले, महिलांसाठी ठरली प्रेरणादायी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विमल जमदाडे यांचा प्रेरणादायी प्रवास, एसटी डेपोत सफाई कामगारासह मोटार मेकॅनिकची करतात काम
  • ... तर प्रत्येक महिला समृद्ध होऊ शकते - विमल जमदाडे

संदीप शिंदे 

माढा - जिच्या हाती पाळण्याची दोरी... ती जगाचा उद्धार करी असे कर्तबगार महिलेबद्दल अभिमानाने म्हटले जाते. या विधानाचा प्रत्यय कुर्डूवाडी आगाराच्या वर्क शॉपमध्ये पहायला मिळाला. विमल चंद्रकात जमदाडे असे त्या जिद्दीने संघर्षमय प्रवास करत आलेल्या महिलेचे नाव आहे.
पतीच्या अपघाती निधनानंतरही त्याच जिद्दीने आयुष्यातील खडतर परिस्थितीवर मात करत लढत आल्या. तिनं मुलींना उच्चशिक्षीत करुन दोघींची लग्न देखील केली. तेही एसटी आगारातील वर्कशाप मध्ये काम करुनच. विमल जमदाडे या महिला पुढे प्रेरणादायी उदाहरण ठरल्या आहेत. पानगाव ता.बार्शी गावच्या रहिवासी असलेल्या जमदाडे दररोज कुर्डूवाडीला ये-जा करतात.
19 मे 1995 साली पती चंद्रकात यांचे अपघाती निधन झाले. पतीच्या निधनाने दुखा:ला कवटाळत न बसता विमल यांनी घरातील गरिबी हलाखीच्या परिस्थितीत मार्गक्रमण सुरु केले. काही महिन्यातच विमल यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा वतीने अनुकंपावर पतीच्या जागी नोकरी मिळाली. काही वर्ष सोलापूर आगारात काम केल्यानंतर त्या अनेक वर्षापासुन पतीची प्रेरणा घेऊन पुरूषाच्या खाद्याला खांदा लावुन त्या जिद्दीने आणी निष्ठेने सफाई कामगारसह मोटार मेकॅनिकची कामे काम करताहेत. एसटीचे अवजड टायर काढणे, जॅक लावुन पुन्हा टायर बसवणे, ग्रेस लावुन सेटिंग करणे, एसटी पत्रा वेल्डिंग यासह इतर सर्वच कामे सहजरित्या करतात. जमदाडे यांनी कष्ट, मेहनत, अन् जिद्दीच्या जोरावर अशक्य ते शक्य करुन दाखवत परिस्थितीशी दोन हात करीत आपल्या कर्तृत्वाने  महिलांसमोर आदर्श ठेवला आहे. विमलताईच्या जिद्दीला...सलाम...तिनं मुलींना केले उच्चशिक्षीत


विमल जमदाडे यांनी पतीच्या अपघाती निधनानंतर मुलींच्या शिक्षणाला कसलीही कमतरता जाणवू दिली नाही. तिन्ही मुलींना एसटी आगारातील कामाच्या जोरावर त्यांनी उच्चशिक्षीत केलंय. मोठी मुलगी कल्पना एम.बी.ए तर मिनाक्षीने एम.एस.सी शिक्षण घेतले. या दोघींची लग्नकार्य पार पडले. तसेच नुकतेच सोनाली ने एम.कॉमची पदवी संपादन केली आहे.... तर प्रत्येक महिला समृद्ध होऊ शकते - विमल जमदाडे 


प्रत्येक महिलेने सक्षम पणे पायावर उभे रहायला हवे. कोणतेही काम संकुचित विचार न करता आणि न लाजता करावे. परिस्थितीशी दोन हात करीत कामात सातत्य ठेवल्यास प्रत्येक महिला समृध्द होऊ शकते - विमल जमदाडे