आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिना खाननंतर आता आमना शरीफ बनली कोमोलिका, समोर आला नवीन लूक 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या 'कसौटी जिंदगी की' या मालिकेत अभिनेत्री हिना खान ही कोमोलिकाची व्यक्तिरेखा साकारत होती. पण काही दिवसांपूर्वी तिने या मालिकेतून काढता पाय घेतला. हिनानंतर ही व्यक्तिरेखा कोण साकारणार याकडे सगळ्यांचे लागले होते. आता ही उत्कंठा संपली असून अभिनेत्रीच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन तिचा मालिकेतील नवीन लूक समोर आला आहे. हिनानंतर आता अभिनेत्री आमना शरीफ कोमोलिकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. मालिकेतील तिचा नवीन लूक समोर आला असून तिचा ग्लॅमरस अंदाज लक्ष वेधून घेणारा आहे.   समोर आलेल्या फोटोत आमना ब्लू कलरच्या ऑफ शोल्डर ब्लाऊज आणि ब्लू लहेंगा,  डार्क कलरच्या आय मेकअपमध्ये अतिशय आकर्षक दिसतेय. नाकात नथ, गळ्यात नेकलेस आणि मोकळे केस यामुळे तिचे सौंदर्य आणखीनच खुलले आहे. 

बातम्या आणखी आहेत...